P. Puttanna Sarkarnama
देश

Legislative Council Election : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव; लोकसभेआधी काँग्रेसनं दिला धक्का

Congress News : काँग्रेसचे उमेदवार पी. पुट्टण्णा यांनी शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

Rajanand More

Karnataka News : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला एनडीएमध्ये घेतलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत एनडीएला फायदा होईल, अशी गणितं मांडली जात होती. पण पहिल्याच परीक्षेत ही आघाडी फेल ठरली आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा काँग्रेसने पराभव करत पहिला दणका दिला आहे. (Legislative Council Election)

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार पी. पुट्टण्णा (P. Puttanna) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजप-जेडीएसचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांचा दीड हजार मतांनी पराभव केला. बंगळुरू शिक्षक मतदारसंघात 16 फेब्रुवारीला झालेला मतदानात 14 हजार 432 जणांनी मतदान केले होते.

पुट्टण्णा यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत बंगळुरू शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला होता. या वेळी त्यांनी भाजपच्या (BJP) तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांनी मागील वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवूनही ते विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसने भाजपला धूळ चारली होती. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी भाजपने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जेडीएससोबत आघाडी केली. या आघाडीनंतर पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. भाजप आणि जेडीएससाठी हा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे पारडे जड

कर्नाटकमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला 224 पैकी 135 जागांवर विजय मिळाला, तर भाजपला केवळ 66 जागा मिळाल्या होत्या. जेडीएसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT