Hyderabad News : लाच घेताना एका महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच रडू कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या महिलेला 84 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. (Corruption News)
हैदराबादमध्ये सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित महिला अधिकारी आदिवासी विकास विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. के. जगा ज्योती असे अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption bureau) सापळा रचून ज्योती यांना 84 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर ज्योती अधिकाऱ्यांसमोर थेट रडू लागल्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या रडताना दिसत असून, त्यांच्या मागे दोन महिला घाबरलेल्या स्थितीत उभ्या असल्याचे दिसते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महिला अधिकाऱ्याकडे सापडलेल्या नोटांची लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यावर त्यांनी लावलेली पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. विभागाकडून सापळा रचताना ही पावडर लावून तक्रारदाराकडे संबंधित नोटा देऊन अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले जाते. या नोटांना हात लावल्यानंतर संबंधितांच्या पावडरचा हाताला लागलेला रंग गुलाबी होतो. त्याआधारे संबंधितांना अटक केली जाते.
लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात ज्योती यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आले आहे. एका कामासाठी 84 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्यांच्याविरोधात करण्यात आली होती. त्याची माहिती घेतल्यानंतर हा सापळा रचण्यात आला होता.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.