Lok Sabha Deputy Speaker : लोकसभा अध्यक्षासह उपाध्यक्षपद देखील महत्त्वाचे मानले जाते. अध्यक्षाच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष सदनाचे कामकाज चालवतो. काँग्रेसने उपाध्यक्षपद विरोधीपक्षाकडे देण्याचे मागणी केली आहे.
मात्र यावर सहमती न झाल्याने लोकसभा अध्यक्षासह उपाध्यक्षपदासाठी देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित युपीए आघाडी 2004 ते 2014 या काळात सत्तेत असताना काँग्रेसने लोकसभा उपाध्यक्षपदासाठी विरोधीपक्षातील नेत्यांना संधी दिली होती.
काँग्रेसचे मनमोहन सिंह पंतप्रधान असताना 2004 ते 2009 या काळात बीजेपीप्रणित एनडीए आघाडीतील अकाली दलाचे खासदार चरणजीत सिंह अटवाल हे लोकसभेचे उपाध्यक्ष होते. तर 2009 ते 2014 या कालावधीत भाजपचे करिया मुंडा हे उपाध्यक्ष होते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देखील मिळू शकले नाही. लोकसभेचे उपाध्यक्षपद काँग्रेसचा विरोधी पक्ष असलेल्या जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाचे के एम थंबीदुरई यांना देण्यात आले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले. मात्र, आपल्या दुसऱ्या कार्यकाळात उपाध्यक्षपदी कोणाचीच नियुक्ती केली नाही. उपाध्यक्ष नसताना संसदेतील वरिष्ठ सदस्य हा उपाध्यक्षाचे कामकाज पाहत असतो.
लोकसभेतील उपाध्यक्षपद हे विरोधीपक्षाकडे द्यावेत, असे संकेत आहेत. त्या संकेतानुसार काँग्रेसकडून (Congress )उपाध्यक्षपद विरोधीपक्षाकडे देण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर एकमत होवू शकले नाही. भाजप नेते राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जून खर्गे यांना लोकसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा यासाठी फोन केला होता.
मात्र, त्यावेळी लोकसभा उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याची मागणी खर्गे यांनी केली होती. त्यावर आपण फोन करतो असे राजनाथ सिंह यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून परत फोन आला नसल्याचे काँग्रेसमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षासह उपाध्यक्षपदासाठी देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.