Parliament Session 2024 : विरोधकांचे मन वळविण्यात भाजपला अपयश आल्याने आज लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. संसदेत ४७ वर्षानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून ओम बिर्ला (Om Birla ) उमेदवार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने के. सुरेश (K Suresh) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
खासदार आपल्यातील दोन सहकाऱ्यांची लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करतात. सभागृहात उपस्थित असलेल्या खासदार ही निवड करीत करतात. लोकसभेच्या 542 जागांपैकी 293 जागा एनडीएकडे आहेत. त्यामुळे एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्याने ओम बिर्ला अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास अडचण येणार नाही. आज सकाळी अकरा वाजता ही निवड होणार आहे.
खासदारांच्या बसण्याची जागा अद्याप निश्चित न झाल्याने इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले सिस्टमने मतदान न होता.मतदानासाठी चिठ्ठीचा वापर करण्यात येणार आहे. प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब उमेदवाराच्या नावांचा प्रस्ताव, अनुमोदक यांचे नाव जाहीर करतील,त्यानंतर उपस्थित खासदारांच्या मतदानाचे आवाहन करतील. ज्या उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते पडतील ते नाव प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करतील.
त्यानंतर सभागृहाचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन अध्यक्षांना आपल्या आसनापर्यंत घेऊन जातील. प्रोटेम स्पीकर नव्या अध्यक्षांकडे सुत्रे सोपवतील. त्यानंतर पक्षाचे नेते नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देतील. यापूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी १९५२, १९६७ आणि १९७६ अशा तीन प्रसंगी निवडणूक झाली होती. त्यानंतर आता ही निवडणूक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.