Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
देश

Mahayuti Seat Sharing : दिल्लीत खलबतं! जागावाटपावर शिक्कामोर्तब? अजित पवारांच्या पदरात अवघ्या...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : महायुतीतील घटक पक्षांत लोकसभेच्या जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून खल सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित बैठक होऊनही अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळत असल्याची माहिती असून चौथ्या जागेसाठी पवार अडून बसल्याचे समजते आहे. त्यावर आज रात्रीत दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली येथे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप लोकसभेच्या तीन जागा सोडण्यावर ठाम आहे. यात बारामती, शिरूर आणि रायगड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर अजित पवार हे मावळ या चौथ्या जागेसाठी आग्रही आहेत. याबाबत काय निर्णय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

'अब की बार चार सौ पार' असा नारा देत भाजपने (BJP) देशभर 370 हून अधिक जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी राज्यात मिशन 45 मोहीम हाती घेतली आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यात भाजप 35 हून अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा देऊन उर्वरित जागा शिवसेनेला देण्यात येणार आहेत. यावर अजित पवार गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांच्यासोबत दोन बैठका होऊनही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने आज रात्री दिल्लीत पुन्हा अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. यात अजित पवार (Ajit Pawar) तीन नाही तर चार जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. जागावाटपांवर तोडगा निघाल्यास भाजप आपल्या दुसऱ्या यादीत राज्यातील उमवेदवारांच्या नावांचा समावेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. यात महायुतीत जागावाटपाचा काय फॉर्म्युला ठरणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT