Shivendraraje Bhosale : 'मुनावळे प्रकल्‍पाचे श्रेय शिवेंद्रसिंहराजेंचेच; काही जणांकडून विपर्यास'

Munavale Project : मुनावळे शिवेंद्रसिंहराजेंच्‍या मतदारसंघात असून त्‍यांनी येथील नागरिकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्‍ध होणार आहे.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosalesarkarnama

Satara Political News : मुनावळे (ता. जावळी) येथील जलपर्यटन केंद्र सुरु होण्‍यासाठी दोन वर्षांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या मार्फतीने सुरु होता. या दीर्घ पाठपुराव्‍यामुळे हे केंद्र होत असून त्‍यामुळे पर्यटनातून तालुका समृध्‍द होणार आहे. याचे सर्व श्रेय शिवेंद्रसिंहराजे यांचे असून गेल्‍या काही दिवसांपासून त्‍याविषयी विपर्यास करणारी विधाने होत असल्‍याची मत जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्‍य राजू भोसले, जिल्‍हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिले.

राजू भोसले म्‍हणाले, पर्यटनातून स्‍थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍यासमवेत बैठक शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली होती. यासाठी तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी शेखर सिंह हे देखील उपस्‍थित होते. या केंद्रासाठीच्‍या सूचना वारंवार शिवेंद्रसिंहराजे करत होते. शेखर सिंह यांनी त्‍यासाठीच्‍या जागेची पाहणी करत अहवाल केला होता. यानंतर आलेल्‍या जितेंद्र डुडी यांच्‍याकडेही त्‍यांचा पाठपुरावा सुरू होता.

Shivendraraje Bhosale
Lok Sabha election 2024 : मोठी बातमी! राहुल गांधींचं ठरलं, अमेठी नाही तर...; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

मुनावळे शिवेंद्रसिंहराजेंच्‍या (Shivendraraje Bosale) मतदारसंघात असून त्‍यांनी येथील नागरिकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्‍ध होणार आहे. पाठपुराव्‍याचे कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. यानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी स्‍थानिकांच्‍या हितासाठी आणि हक्कासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे कोयना जलाशयात मासेमारीसह बोटींगसाठीचे हक्क अबाधित राहिले आहेत.

तापोळा परिसराला जोडण्‍यासाठीच्‍या पुलाचे काम देखील उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍या मार्गदर्शनाखाली मंजूर करुन घेतला आहे. यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचेही येथील विकासकामांसाठी वेळोवळी मदत मिळाली आहे. या प्रक्रियेत शिवेंद्रसिंहराजे यांचा महत्‍वाचा सहभाग असून त्‍याबाबत सर्वसामान्‍य जनतेला माहिती असल्‍याचेही रांजणे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Shivendraraje Bhosale
Narayan Rane : नारायण राणे रामदास कदमांवर चिडले; म्हणाले, केसाने गळा कापणारे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com