Amritpal Singh, Engineer Rasheed Sarkarnama
देश

Amritpal Singh-Sheikh Abdul Rasheed : निवडून आलेले ‘हे’ दोन खासदार कोठडीतच राहणार

Lok Sabha Election 2024 Result Amritpal Singh Sheikh Abdul Rasheed : अमृतपाल सिंह आणि शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनिअर रशीद हे दोघेही सध्या जेलमध्ये आहेत.

Rajanand More

Parliament News : लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. कुणाची सत्ता येणार, कुणाला मंत्रिपदं मिळणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. पण दुसरीकडे निवडून आलेल्या दोन खासदारांना पदाची शपथ तरी घेता येईल, याबाबतचा सस्पेन्स आहे.

पंजाबमधील खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमृततपाल सिंह आणि जम्मू-काश्मीरमधील बारामूला मतदारसंघातून विजयी झालेली शेख अब्दुल रशीद अशी या दोन खासदारांची नावे आहेत. दोघेही सध्या वेगवेगळ्या जेलमध्ये आहेत. जेलमधूनच त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही. शेख यांनी ओमर अब्दुल्ला यांचा तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

अमृतपाल यांच्यावर खलिस्तानला समर्थनार्थ अजेंडा चालवल्याचा आरोप आहे. त्यांना अटक करून आसाममधील डिब्रूगढ जेलमध्ये ठेवले आहे. त्याल वर्षभरापुर्वी अटक करण्यात आली आहे. तर शेख हे मागील साडे चार वर्षांपासून तिहार जेलमध्ये आहेत. काश्मीरमध्ये टेरर फंडिंगचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना 9 ऑगस्ट 2019 मध्ये अटक करण्यात आली आहे.

दोघेही निवडून आले असले तरी त्यांना संसदेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. कायद्यानुसार, या दोघांना खासदारकीची शपथ घेता येईल. दोघे जेलमध्ये असल्याने त्यांना शपथ घेण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरही हे शक्य होऊ शकते.

शपथ घेतल्यानंतर दोघांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल. लोकसभेच्या कामकाजात मात्र त्यांना सहभागी होता येणार नाही. दोघांवरील आरोपही गंभीर आहेत. आरोप सिध्द झाल्यास त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. असे झाल्यास त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे.

कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी काही महिन्यांपुर्वीच रद्द झाली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली होती. सिंह आणि शेख या दोघांनाही शिक्षा झाल्यास त्यांचीही खासदारकी रद्द होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT