Modi Government 3.0 : मोदींशेजारी मांडल्या दोन बाबू अन् शिंदेंच्या खुर्च्या; कॅबिनेटमध्ये ‘Team CM’ चा थाट

Lok Sabha Election 2024 Result Modi Government PM Narendra Modi Eknath Shinde : भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्याने मित्रपक्षांच्या भरवशावर सरकार चालवावे लागणार आहे.
PM Narendra Modi, Chandrababu Naidu, Nitish Kumar, Eknath Shinde
PM Narendra Modi, Chandrababu Naidu, Nitish Kumar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्या टर्ममध्ये मोठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला स्बळावर बहुमत मिळवता न आल्याने मित्रपक्षांच्या भरवशावर सरकार चालवावे लागणार आहे. प्रामुख्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत गोंजारावे लागणार आहे.

‘एनडीए’तील नेत्यांची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान मोदींच्या शेजारी चंद्राबाबू, त्यांनंतर नितीशबाबू, त्यांच्याशेजारी एकनाश शिंदे अशा खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तीन मुख्यमंत्र्यांची सरकारमधील ‘पॉवर’ कॅबिनेटमध्येही अशीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार, यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. भाजपला जेमतेम 240 चा आकडा गाठता आल्याने मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापन करावी लागणार आहे. चंद्राबाबूंना 16 तर नितीशबाबूंना 12 आणि शिंदेंना सात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्या क्रमाने त्यांच्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे.

PM Narendra Modi, Chandrababu Naidu, Nitish Kumar, Eknath Shinde
PM Narendra Modi in Maharashtra : महाराष्ट्रात मोदींचा पराभव; जिथे सभा, तिथे हार...ही लिस्ट वाचाच...

भाजपच्या मंत्र्यांच्या खर्च्यांवर मित्रपक्षांचे खासदार बसणार हे निश्चित. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद असे सुत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार चंद्राबाबूंना तीन आणि नितीशबाबूंना दोन आणि शिंदेंना एक कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतो. त्यासाठी या पक्षांकडून दबाव टाकला जाईल. त्याचप्रमाणे राज्यमंत्रिपद, लोकसभा अध्यक्षपदासाठीही जोरदार फिल्डींग लावली जाणार, हे स्पष्ट आहे.

या तीन मोठ्या पक्षांप्रमाणेच चिराग पासवान, पवन कुमार, अजित पवार आणि इतर छोटे पक्ष व अपक्षांचीही मोदींना मनधरणी करावी लागणार आहे. त्यांनाही कॅबिनेट किंवा राज्यमंत्रिपद देऊन खूश ठेवावे लागेल.

त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान मंत्र्यांना लालदिवा मिळणार नाही. या नेत्यांना सावरण्याची जबाबदारीही भाजप पक्षश्रेष्ठींवर असेल. त्यामुळे मोदींची सत्ता येणार असली तरी अनेक आघाड्यांवर त्यांना कसरत करावी लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com