NitishKumar, Amit Shah Sarkarnama
देश

CM Nitish Kumar : नितीशकुमार पुन्हा ‘एनडीए’त? अमित शाह यांच्या विधानानंतर घडामोडींना वेग

Rajanand More

NDA News : इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीचा पाया रचला. पण आता तेच भाजपप्रणित एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्याचे कारण ठरले आहे, अमित शाहांचे एक विधान.

अमित शाहांनी (Amit Shah) नुकत्याच एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरून बिहारच्या (Bihar) राजकारणात वादळ उठले आहे. नितीशकुमार (NitishKumar) पुन्हा 'एनडीए'त (NDA) येऊ शकतात का, या प्रश्नाला उत्तर देताना शाहांनी प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असे म्हटले. काही दिवसांपर्यंत भाजपचे (BJP) नेते नितीशकुमारांसाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद असल्याचे सांगत होते. या पार्श्वभूमीवर शाहांचे हे विधानच बिहारमधील राजकीय हालचालींचे कारण बनले आहे.

बिहारमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांच्या घरी भाजपच्या आमदारांची बैठक झाली, तर नितीशकुमारांनी जेडीयूचे सर्व आमदार व खासदारांना पुढील आदेशापर्यंत पटनामध्ये थांबण्यास सांगितले आहे. भाजपसोबत असलेल्या जीतनराम मांझी यांनीही सर्व आमदारांना 25 जानेवारीपर्यंत राजधानीतच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पटनामध्ये आरजेडीप्रमुख लालूप्रसाद यादव व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना तेजस्वी यांनी ही नियमित भेट असल्याचे सांगितले. आम्ही सर्वजण नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्याचे म्हटले. दुसरीकडे नितीशकुमार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

25 जानेवारीआधी काय होणार?

अमित शाहांचे सूचक विधान, भाजप आमदारांची बैठक, मांझी यांनी २५ तारखेपर्यंत पटनामध्ये थांबण्याचे आमदारांना दिलेले आदेश, नितीशकुमारांनीही आमदार-खासदारांना दिलेली सूचना, लालू-नितीश भेट या घडामोडींमुळे बिहारमध्ये २५ जानेवारीआधी राजकीय उलथापालथ होणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांत काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT