Abhijit Gangopadhyay  Sarkarnama
देश

Abhijit Gangopadhyay News : गांधी आणि गोडसे यांच्यापैकी..! वादग्रस्त विधानामुळे गंगोपाध्याय यांची उमेदवारी जाणार?

Lok Sabha Election 2024 : अभिजित गंगोपाध्याय यांना बंगालमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आहे.

Rajanand More

New Delhi News : पश्चिम बंगालमध्ये भाजपने माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay News) यांना उमेदवारी दिली आहे. न्यायाधीशपदावर असताना त्यांनी दिलेले काही आदेश वादग्रस्त ठरले होते. पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आता त्यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला असून, काँग्रेसने त्यांची उमेदवारी परत घेण्याची मागणी केली आहे.

गंगोपाध्याय यांनी एका बंगाली वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि नथुराम गोडसेविषयी (Nathuram Godse) वादग्रस्त विधान केले आहे. गांधी आणि गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच गोडसेच्या कृत्यामागचे कारण माहिती करून घ्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘मी कायद्याच्या क्षेत्रातील असल्याने एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गोडसेविषयीचे लेखन वाचून, महात्मा गांधींची हत्या का केली हे समजून घ्यायला हवे. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसेमधील एकाची निवड करू शकत नाही,’ असे विधान गंगोपाध्याय यांनी केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गंगोपाध्याय यांच्या या विधानावर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला आहे. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी गंगोपाध्याय यांची उमेदवारी परत घ्यावी, अशी मागणी भाजपकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कोलकाता हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांनी केलेले विधान संतापजनक आहे. भाजपचे (BJP) उमेदवार असलेले गंगोपाध्याय यांना पंतप्रधानांचा आशीर्वाद आहे.

गांधी आणि गोडसेमधील एकाची निवड करू शकत नाही, हे विधान आपण स्वीकारू शकत नाही. त्यामुळे गांधींचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न न केलेल्यांची उमेदवारी परत घ्यायला हवी. राष्ट्रपित्याचे संरक्षण करण्यासाठी डोनेशनचे पिता काय करणार, असा टोलाही जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केला आहे.

दरम्यान, गंगोपाध्याय यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने (TMC) युवा नेत्याला मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांचा उल्लेख बीजेपी बाबू असा केला होता. तसेच ते कोणत्याही मतदारसंघातून उभे राहिले तरी त्यांच्याविरोधात विद्यार्थ्यांना उभे करू, असे त्यांनी म्हटले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT