Lok Sabha Election 2024 : वीरप्पनची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात; कोणता पक्ष, कोणता मतदारसंघ?

Vidya Rani News : विद्या राणी या जुलै 2020 मध्ये राजकारणात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Vidya Rani, Veerappan
Vidya Rani, VeerappanSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणीही लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरली आहे. 2020 मध्येच भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रिय झालेल्या विद्या राणी या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांना तमिळनाडूतील कृष्णागिरी मतदारसंघातून नाम तमिझर काची पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्यानंतर विद्या राणी (Veerappan Daughter Vidya Rani) यांना तमिळनाडू भाजप युवा शाखेचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी तमिळनाडूतील (Tamil Nadu) अभिनेते सीमान यांच्या एनटीके पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली आहे. विद्या राणी या वकील असून, कृष्णागिरीमध्येच शाळा चालवतात.

Vidya Rani, Veerappan
Lok Sabha Election 2024 : वसुंधरा राजेंचा विश्वासू नेता देणार ओम बिर्लांना टक्कर; भाजपला धक्का

विद्या राणी या आपले वडील वीरप्पन यांना केवळ एकदाच भेटल्याचे सांगतात. पण त्यांनी आपल्या आयुष्याला वेगळी दिशा दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वडिलांनी आपल्याला डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्यास सांगितले होते. मेहनत करून नाव कमवायला सांगितले होते. आज त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहाेचल्याचे विद्या राणी सांगतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, विद्या राणीच्या आई मुथुलक्ष्मी या आमदार टी. वेलमुरुगन यांच्या राजकीय संघटनेमध्ये कार्यरत आहेत. विद्या राणी यांना वनवासी कल्याण आश्रमाने दत्तक घेतले होते. आश्रमात राहून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या पेशाने वकील असून, सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. प्रामुख्याने आदिवासी आणि दलितांसाठी त्यांचे काम आहे.

सीमान यांना आतापर्यंत तमिळनाडूमध्ये 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यापैकी वीस उमेदवार महिला आहेत. सीमान यांच्या पक्षाकडून लिट्टे नेता वेलुपिल्लई प्रभाकरनची प्रशंसा केल्याप्रकरण वादात अडकली होती. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा किती प्रभाव पडणार, याबाबत उत्सुकता आहे.

R

Vidya Rani, Veerappan
Lok Sabha Election 2024 : महुआंच्या विरोधात राजमाता रिंगणात; भाजपला राजघराणे मिळवून देणार विजय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com