PM Narendra Modi, Anantkumar Hegde Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या खासदारांना भाजपकडून घरचा रस्ता

Rajanand More

Karnataka News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या विद्यमान खासदारांना भाजपकडून घरचा रस्ता दाखवण्यात आले आहे. कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट भाजपने कापले आहे. या माध्यमातून भाजपने वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना एकप्रकारे इशारा दिल्याचे मानले जात आहे. हेगडेंनी या मतदारसंघातून सहा निवडणुका जिंकल्या आहेत.

भाजपने (BJP) रविवारी विविध राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कर्नाटकातील (Karnataka) उत्तर कन्नड मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेगडे (MP Anantkumar Hegde) हे मागील 28 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी मागील सलग चार निवडणुकांमध्ये याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

काही दिवसांपूर्वीच हेगडेंनी संविधान (Constitution) बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 हून अधिक जागा आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते. या विधानानंतर भाजपने त्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे जोरदार चर्चा होती. रविवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.

भाजपने उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून हेगडे यांच्याऐवजी विश्वेश्वर हेगडे कगेरी यांना उमेदवारी दिली आहे. या माध्यमातून भाजपने वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. हेगडे यांच्याआधी प्रज्ञा सिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर काही नेत्यांनाही तिकीटे नाकारण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बेळगावमध्ये जगदीश शेट्टार

बेळगाव मतदारसंघातून भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीचे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपला राम राम ठोकला होता. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना लोकसभेची लॉटरी लागली आहे.

कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात

भाजपने अभिनेत्री कंगना रनौतला (Kangna Ranaut) निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले आहे. या मतदारसंघाच्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे कंगनाच्या विरोधात काँग्रेसकडून (Congress) कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT