Lok Sabha Election 2024 : महुआंच्या विरोधात राजमाता रिंगणात; भाजपला राजघराणे मिळवून देणार विजय?

Mahua Moitra Vs Amrita Roy : अमृता रॉय यांनी मागील आठवड्यातच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना महुआ मोईत्रा यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले आहे.
Mahua Moitra, Amrita Roy
Mahua Moitra, Amrita RoySarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि संसदेत पैशांच्या बदल्यात प्रश्न या प्रकरणामुळे खासदारकी गमावलेल्या महुआ मोईत्रा यांच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महुआ यांच्याविरोधात भाजपने बंगालमधील राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भाजपने काल 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमृता रॉय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बंगालमध्ये भाजपने 35 जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काही जणांना आयत्यावेळी पक्षप्रवेश देत त्यांना तिकिटे देण्यात आली आहेत.

Mahua Moitra, Amrita Roy
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींविरोधात भाजपनं तगडा उमेदवार उतरवला मैदानात

मागील निवडणुकीत महुआ मोईत्रा यांनी भाजपचे उमेदवार कल्याण चौबे यांचा 63 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यांना तब्बल सहा लाखांहून अधिक मतं मिळाली होती. मात्र, या वेळी त्यांच्यासाठी ही लढत सोपी नसली, असे मानले जात आहे. संदेशखाली प्रकरण, तृणमूल काँग्रेसमधील नेते, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचा परिणाम निवडणुकीत होऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने अमृता रॉय यांना मैदानात उतरवत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या भागात त्या लोकप्रिय आहेत. त्या अठराव्या शतकातील राजा कृष्ण चंद्र देव यांच्या घराण्यातील आहेत. नदिया जिल्ह्यातील या राजघऱाण्याचे योगदान मोठे आहे. आजही लोकांमध्ये या घराण्याविषयी आदर आहे. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत होऊ शकतो, असे मानले जात आहे.

दिलीप घोष यांचा मतदारसंघ बदलला

बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार दिलीप घोष यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. त्यांना मेदिनीपूर ऐवी आता वर्धमान दुर्गापूर मतदारसंघातून उतरवण्यात आले आहे. तर आसनसोल मतदारसंघाच्या आमदार अग्निमित्रा पॉल मेदिनापूरमधून निवडणूक लढतील. टीएमसीतून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या तापस रॉय यांना कोलकाता उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

R

Mahua Moitra, Amrita Roy
JNU Election Results : ‘जेएनयू’मध्ये जय भीम अन् लाल सलामचा नारा; ABVP चा सुपडा साफ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com