Nagpur News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, पण त्याआधीच देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याकडूनही सातत्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केलं जात आहे. आता त्यांनी खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. मैदान तुम्ही निवडा, कार्यकर्ता आम्ही निवडतो, असे इराणी यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे आयोजित नमो युवा महासंमेलनात बोलताना इराणी यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) हे आव्हान दिले. माझा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहाेचत असेल, तर त्यांनी ऐकावे. कोणत्या सरकारचे दहा वर्षांचे काम चांगले आहे, यावर खुली चर्चा करू. मैदान तुम्ही निवडा, कार्यकर्ते आम्ही निवडू, असे इराणी म्हणाल्या.
देशात अंधकार असताना गांधी कुटुंबात झगमगाट होता. आजही त्यांच्यामध्ये अहंकार आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांनी नाकारले. राहुल गांधी, तुम्ही मैदान निवडा, आम्ही कार्यकर्ते निवडू. तुमच्या सरकारची दहा वर्षे आणि आमची दहा वर्षे, यावर चर्चा होऊन जाऊद्या. युवा मोर्चाचा कार्यकर्ता बोलायला लागला तर ते बोलणेच विसरून जातील, असा टोला इराणींनी (Smriti Irani) लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना पुन्हा अमेठीतून (Amethi costituency) निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. वायनाडमध्य निवडणूक न लढता केवळ अमेठीतून लढा, असे इराणी म्हटल्या. 2019 च्या निवडणुकीत इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला होता. या मतदारसंघातून राहुल गांधी 2004 पासून निवडून येत होते. या मतदारसंघात इराणी यांच्या विजयासाठी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) 2019 मध्ये आपल्या बहिणीला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
दरम्यान, राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्या ते केरळातील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. या वेळी ते कोणत्या मतदारसंघाला पसंती देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.