Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या प्रचारासाठी भाजप पाजळणार 'ज्ञान'; राम मंदिर, कलम 370 सह...

BJP On Lok Sabha Election : प्रचारामध्ये सरकारची धोरणे, राम मंदिर, कलम 370 या मुद्द्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GYAN फॉर्म्युल्याचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

Anand Surwase

Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून यावेळी 400 पार जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यासाठी पक्षाकडून प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून निवडणूकपूर्व वेगवेगळ्या मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी (24 फेब्रुवारी) रोजी नवी दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारींची बैठक घेतली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रचारामध्ये सरकारची धोरणे, राम मंदिर, कलम 370 या मुद्द्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GYAN फॉर्म्युल्याचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. निवडणुकीपूर्वीच प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून'गाव चलो'अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान आणखी तीव्र करण्याच्या सूचनाही भाजपकडून निवडणूक प्रभारींना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तरुण मतदारांपर्यंत पोहोचावे, त्यांच्यापर्यंत सरकारने केलेल्या कामाचे मुद्दे, राम मंदिर निर्मिती, काश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा मुद्द्यावर तरुणांमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

प्रचाराची रणनीती आखताना भाजपकडून आणखी एका फॉर्म्युलाचा प्रचारामध्ये वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेला GYAN फॉर्म्युला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित देश म्हणून नावारुपास आणण्यासाठी ज्ञानाची (GYAN) भूमिका महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचाच आधार घेत मोदी यांनी GYAN चे विश्लेषण हे G म्हणजे गरीब, Y म्हणजे तरुण, A म्हणजे अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि N म्हणजे नारी म्हणजे महिला असे केले होते. या सर्वांच्या विकास झाल्यानंतर देश विकसित होईल असे मत व्यक्त केले होते. आता हाच फॉर्म्युला घेऊन भाजप निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहे.

भाजपचे सर्व निवडणूक प्रभारी हे मोदी सरकारने (Narendra Modi) राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढील 100 दिवसांत लाभार्थी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचे आवाहन केले होते.मोंदीच्या या आवाहनाची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप अध्यक्ष नड्डा यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपकडून 370 जागा तर एनडीएसाठी 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी विशेष रणनीती आखली जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT