Lok Sabha Election 2024 : खासदाराच्या भाजप प्रवेशानंतर बसपामध्ये होणार विस्फोट? मायावती थेट तिकीटावरच बोलल्या...

Mayawati News : खासदार रितेश पांडे यांनी आज बसपाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मायावतींना मोठा धक्का बसला आहे.
Mayawati
MayawatiSarkarnama

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या एका खासदाराने आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र बसपाच्या प्रमुख मायावतींनी खासदारांना सूचक इशारा दिला आहे. काही विद्यमान खासदारांची तिकीट कापली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने बसपामध्ये विस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)

खासदार रितेश पांडे यांनी रविवारी सकाळी बसपाच्या (BSP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थित पांडे यांचा पक्षप्रवेश झाला. पांडे हे आंबेडकरनगर मतदारसंघाचे खासदार आहेत.

Mayawati
Lok Sabha Election 2024 : संसदेत मोदींसोबत जेवण केलेल्या खासदाराचा राजीनामा; मायावतींना धक्का

पांडे यांच्यासह आणखी काही आमदार पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर मायावतींनी (Mayawati) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, बसपा राजकीय पक्षासोबतच डॉ. बाबासाहेब आंडेकरांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या मिशनसाठीची चळवळही आहे. त्यामुळे पक्षाचे धोरण आणि कार्यशैली धनदांडग्या पक्षांपेक्षा वेगळी आहे. हे विचारात घेऊनच निवडणुकीत उमेदवारी दिली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता बसपाच्या खासदारांना या कसोटीवर उतरून आपण आपल्या मतदारसंघातील जनतेकडे किती लक्ष दिले हे तपासावे लागेल. आपण मतदारसंघात वेळ दिला का?, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी दिलेल्या आदेशांचे योग्यप्रकारे पालन केले का?, असे सवाल मायावतींनी उपस्थित केले.

मायावतींनी पुढे म्हटले आहे की, काही खासदार इकडे-तिकडे भटकत असल्याचे दिसते आणि नकारात्मक चर्चेत असताना अधिकाधिक लोकसभा खासदारांना तिकीट देणे शक्य आहे का? मीडियातून हे सगळी माहिती मिळूनही ही पक्षाची कमजोरी असल्याचा प्रचार करणे अनुचित आहे. पक्षाचे हितच सर्वोपरी आहे, असे सांगत मायावतींना खासदारांना थेट इशारा दिला आहे.

Mayawati
Mann Ki Baat News : ‘मन की बात’ला मोठा ब्रेक; पंतप्रधान मोदींनीच केली घोषणा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com