New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा (Lok sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला असून सोमवारी (ता. 13) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याआधी भाजपने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे एक चॅलेंज स्वीकारले आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राहुल यांना पत्र लिहून चॅलेंज स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. हे चॅलेंज आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच व्यासपीठावर चर्चा करण्याचे.
सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि हायकोर्टाच्या दोन माजी न्यायाधीशांसह एका संपादकांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राहुल गांधींना एकाच व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले होते. या व्यासपीठावर विविध मुद्यांवर खुली चर्चा करावी, असे पत्र दोन्ही नेत्यांना लिहिण्यात आले होते. त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हे चॅलेंज स्वीकारल्याचे म्हटले होते. (Latest Political News)
तेजस्वी सूर्या (Tejashwi Surya) यांनी राहुल यांचे चॅलेंज स्वीकारत असल्याचे म्हणत त्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रिय राहुल गांधी, भारतीय जनता युवा मोर्चाने तुमच्यासोबत चर्चेसाठी आमचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना नियुक्त केले आहे. ते एससी प्रवर्गातील असून एक युवा आणि शिक्षित नेते आहेत. ते ज्या समाजातील आहेत, त्या समाजाची रायबरेलीतील संख्या जवळपास 30 टक्के आहे. एक राजकीय वारसा आणि एक सामान्य युवककामध्ये ही चर्चा होईल, असे सूर्या यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, जयराम रमेश यांनी रविवारी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींसोबत चर्चा करण्याचे निमंत्रण स्वीकारण्याची हिंमत अजून दाखवलेली नाही. राहुल यांनी शनिवारीच मोदींसोबत चर्चा करण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे आणि पंतप्रधान यात सहभागी होतील, अशी आशा देशाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सूर्या यांच्या पत्रावर राहुल गांधी किंवा काँग्रेस काय उत्तर देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी स्वत: चर्चेला जाणार का, की भाजपप्रमाणेच इतर कोणत्या नेत्यांना पाठवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.