Karnataka News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अनेक मतदारसंघांत बंडखोरीचे वारे वाहू लागले असून आमदार, पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्नाटक काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नाही. एका मतदारसंघातील उमेदवारावरून सात विद्यमान आमदारांनी थेट राजीनाम्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. एका मंत्र्यांच्या नातेवाइकाला तिकीट दिल्याने हे आमदार नाराज झाले आहेत.
कर्नाटकात (Karnataka) काँग्रेस सत्तेत आहे. कोलार मतदारसंघात अन्न व पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांच्या नातेवाइकाला लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यानंतर मतदारसंघातील आमदारांची नाराजी पुढे आली आहे. विधानसभेचे (Assembly) पाच आणि विधान परिषदेच्या दोन आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये एका मंत्र्यांचाही समावेश आहे.
कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनीही मीडियाशी बोलताना याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण गुलाम बनू शकत नाही, असे इतर आमदारांचे म्हणणे असल्याचे सुधाकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. एका कुटुंबाचे (मुनियप्पा) आपण गुलाम नाही, असे हे आमदार म्हणाल्याचा दावा सुधाकर यांनी केला आहे. पक्षाकडून केवळ एका कुटुंबातच तिकीटे दिली जात असल्याचेही ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षातील इतर लोकांनाही संधी मिळायला हवी. आम्ही मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्याशी बोलणार आहोत. मुनियप्पा यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे त्रास आम्ही सहन केला आहे. अडचणींचा सामना करावा लागला आहे. मतदारसंघात एका अनुसूचित जातीतील उमेदवाराला संधी मिळायला हवी, अशी भावना या मतदारसंघात असल्याचे सुधाकर म्हणाले.
आम्हाला या कुटुंबाव्यतिरिक्त इतर उमेदवार हवा, अशी ठाम भूमिका मांडत या आमदारांनी पक्षश्रेष्ठींना राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली, पण त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असा दावाही त्यांनी कला आहे. या वादावर बोलताना मुनियप्पा यांनी आपण पक्षाच्या निर्णयाशी बांधील असल्याचे सांगितले.
मुनियप्पा म्हणाले, काँग्रेस (Congress) पक्षाच्या निर्णयाशी मी बांधील आहे. पक्षश्रेष्ठींनाच याबाबत निर्णय घेऊद्यात, असे म्हणत मुनियप्पा यांनी हात वर केले. दरम्यान, 21 मार्चला काँग्रेसकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत कर्नाटकातील 17 उमेदवार होते. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जावयासह पाच मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.