Lok Sabha Election 2024 : वरुण गांधींचं ठरलं! सुलतानपूरमध्ये प्रचार करणार...

Varun Gandhi News : भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे ते याबाबत काय निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली होती.
Maneka Gandhi, Varun Gandhi
Maneka Gandhi, Varun GandhiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपचे नेते खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्याआधीच त्यांनी चार उमेदवारी अर्ज नेले होते. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढणार, अशी चर्चा होती. त्यातच काँग्रेसनेही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरुण यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर आज याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भाजपने (BJP) काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये वरुण (Varun Gandhi) यांच्या आई मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, तर वरुण यांना पिलिभित मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे ते भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी करणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली होती. पण दुसरीकडे आईही निवडणुकीच्या मैदानात असल्याने ते संयमी भूमिका घेतील, अशीही चर्चा होती.

Maneka Gandhi, Varun Gandhi
CM Arvind Kejriwal News : केजरीवालांचे ‘ते’ दोन आदेश वादात; ईडीच्या दाव्याने अडचणी वाढणार?

अखेर आज वरुण गांधी यांची भूमिका समोर आली आहे. ते लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आई मनेका गांधी यांचा सुलतानपूर मतदारसंघात ते प्रचार करणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या (Congress) ऑफरचा विचारही केला नसल्याचे दिसते. बंडखोरी केल्यास आईच्या विरोधात नकारात्मक मत तयार होऊ शकते. त्यामुळे त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी काल वरुण यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. ते गांधी असल्यामुळे भाजपने त्यांचे तिकीट कापल्याचा दावा चौधरींनी केला होता. काँग्रेसच्या या ऑफरनंतर राहुल आणि वरुण एकत्र येणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मागील वर्षी दोघांची भेटही झाली होती. पण अखेर आज त्यावर पडदा पडला.

भाजपचे यूपी अध्यक्ष भूपेंद्र सिंह यांनी वरुण गांधी पक्षासोबत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यांच्याविषयी पक्षाने काही चांगला विचार केला असले. ते भाजपचे सच्चे सैनिक आहेत. ते भाजपमध्ये राहतील. भाजपने त्यांना तीन वेळा खासदार बनवले आहे, असे सिंह म्हणाले होते.

R

Maneka Gandhi, Varun Gandhi
Assembly Elections 2024 : भाजपकडून ‘खेला’! काँग्रेसमधील 'त्या' सहा बंडखोरांना उमेदवारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com