New Delhi : देशभरात भाजपविरोधात बहुतेक विरोधी पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून काही पक्षांमध्ये वाटाघाडीही सुरू आहेत. पण बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती मात्र वेगळीच खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केली असली तरी इतर राज्यांमध्ये त्यांनी छोट्या-छोट्या पक्षांशी आघाडी करण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे समजते. या पक्षांना हाताशी धरून अपेक्षित यश मिळाल्यास त्या सत्तेतही सहभागी होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीए किंवा इंडिया आघाडीपासून मायावतींनी लांब राहणेच पसंत केले आहे. पण असे असले तरी दोन्ही आघाडींमध्ये नसलेल्या पक्षांशी आघाडी करण्याची त्यांची रणनीती आहे. त्यासाठी त्यांनी चाचपणीही सुरू केली आहे. त्यानुसार हरयाणामध्ये भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षासोबत घेतले आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. बसपाला (BSP) सहा आणि लोकदलला चार जागा असा समझोता होऊ शकतो.
2019 मध्येही लोकदल आणि बसमामध्ये आघाडी झाली होती. पण निवडणुकीच्या (Election) तोंडावर आघाडीत बिघाडी झाली. आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. हरयाणापाठोपाठ पंजाबमध्ये अकाली दलासोबत मायावतींची आघाडी पक्की झाल्याचे मानले जाते. अकाली दल ना सोबत आहे, ना इंडियामध्ये. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. या भूमिकेचा फटका एनडीएसह इंडियाच्या उमेदवारांनाही बसू शकतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्येही बसपाकडून इतर छोट्या पक्षांशी हातमिळवणी केली जाऊ शकते. मध्य प्रदेशात गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत चर्चा सुरू असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत या पक्षांसह बसपाला चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतर ते सत्तेत सहभागी होऊ शकतात. मायावती यांनीही तसे संकेत दिले आहेत.
आघाडीबाबत निवडणुकीनंतर विचार केला जाईल, असे त्या बोलून दाखवतात. त्यामुळेच त्यांनी एनडीए आणि इंडियामध्ये नसलेल्या पक्षांत सोबत घेण्यासाठी गळ टाकल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. उत्तर प्रदेशात बसपाची स्थिती फारशी चांगली नाही. तसेच इतर राज्यांमध्ये ताकद नाही. त्यामुळे इतर पक्षांशी आघाडी करून त्या ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये त्यांना यश मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही फायदा होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.