Nakul Nath, PM Narendra Modi, Kamal Nath Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत इतिहास घडवण्यासाठी भाजपला हवेत ‘नाथ’; असं आहे गणित...

Rajanand More

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदारपुत्र नकुलनाथ हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण कमलनाथ यांनी त्यावर पडदा टाकत काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले. पण त्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘नाथ’ हवे आहेत. त्यामागचे कारणही तसंच आहे. मागील लोकसभा निवडणुकीत कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेला छिंदवाडा मतदारसंघ मोदी लाटेतही शाबूत राहिला अन् भाजपला क्लीन स्वीपपासून रोखले. (Lok Sabha Election 2024)

छिंदवाडा मतदारसंघ सुरूवातीपासूनच हा सुरूवातीपासूनच काँग्रेसचा (Congress) गड मानलो जातो. कारण 1952 पासून केवळ एक पोटनिवडणूक वगळता विरोधकांना या मतदारसंघात विजय मिळवता आलेला नाही. कमलनाथ हे या मतदारसंघातून तब्बल नऊ वेळा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे पोटनिवडणूकीत त्यांचाच पराभव झाला होता. सध्या त्यांचे पुत्र नकुलनाथ हे खासदार आहे. (Kamal Nath Latest News)

कमलनाथ यांच्या पत्नी अलका यांनीही काही काळासाठी छिंदवाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. येथील मतदारांनी काँग्रेसला कधीच निराश केले नाही. 1996 मध्ये एका आरोपात अडकल्याने कमलनाथ यांनी पत्नीला उमेदवारी दिली होती. आरोपमुक्त होताच पत्नीला राजीनामा द्यायला सांगितल्याने पोटनिवडणूक लागली. 1997 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते सुंदरलाल पटवा यांनी कमलनाथ यांचा पराभव केला होता. मात्र पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा कमलनाथ यांच्यावरच विश्वास दाखवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी लाटेतही विजय

देशात २०१४ मध्ये मोदी लाटेत विरोधकांचा सुपडा साफ झाला. मध्य प्रदेशात भाजपला (BJP) 29 पैकी 27 जागा मिळाल्या. २०१९ मध्येही मोदी करिष्मा चालला. यावेळी भाजपला 28 जागा मिळाला. या लाटेत छिंदवाडा मतदारसंघाने काँग्रेसची लाज राखली. या निवडणुकीत नकुलनाथ यांनी 37 हजार मतांनी विजय मिळवला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, ‘नाथ’ पक्षात आल्याशिवाय विजय मिळणार नाही, याची खात्री असल्यानेच भाजपकडून त्यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

नकुलनाथांसाठी भाजप सकारात्मक

कमलनाथ यांना पक्षात घेण्यात भाजपमधीलच काही नेत्यांचा विरोध आहे. मात्र, नकुलनाथ यांच्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवरील काँग्रेसचा उल्लेख काढल्याने चर्चेला उधाण आले आहे. नकुलनाथ हे भाजपमध्ये आल्यास भाजपला क्लीन स्वीप मिळू शकतो, अशी आशा नेत्यांना आहे. मोदी करिष्मा यावेळीही चालेल, अशा विश्वास नेत्यांना आहे. यावेळी भाजपने 370 चे टार्गेट निश्चित केल्याने त्यासाठी प्रत्येक जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघ विजयात मिठाचा खडा टाकू शकतो. त्यामुळे भाजपचे नेते शर्तीचे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT