Mahanand Dairy News : महानंदची नुसतीच चर्चा! ‘अमूल जैसा कोई नहीं’, म्हणत मोदींनी दिलं मोठं टार्गेट

Mahanand Dairy Issue : महानंदचे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राजकारण तापलं आहे.  
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Political News : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरीवरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. ही डेअरी गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाकडे चालवण्यास दिली जाणार आहे. त्यावरून विरोधक संतापले आहेत, तर दुसरीकडे गुजरातमधील प्रसिद्ध अमूल डेअरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच तोंडभरून कौतुक करत मोठं टार्गेटही दिलं. (Mahanand Dairy News in Marathi)

महानंद डेअरी डबघाईला आली असल्याने त्याचे व्यवस्थापन एनडीडीबीकडे (NDDB) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक वर्षे होऊनही महानंद ब्रँड नावारूपाला येऊ शकला नाही, तर दुसरीकडे गुजरातमधील (Gujarat) ‘अमूल’ ब्रँडने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. जगाच्या पातळीवर अमूल पहिल्या दहा क्रमांकामध्ये आहे. 

PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : कट्टर दुश्मन येणार एकत्र; भावाची हत्या करणाऱ्याच्याच भावाचा प्रचार करण्याची वेळ...

राज्यात महानंदवरून राजकारण सुरू असताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातमध्ये होते. त्यांनी गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बाराशे कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण केले. अमूल हा या फेडरेशनचा ब्रँड आहे. या वेळी पंतप्रधान मोदींनी अमूलचे तोंडभरून कौतुक केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात अनेक ब्रँड आले, पण अमूलसारखे कुणीच नाही. अमूल म्हणजे विश्वास, अमूल म्हणजे विकास, अमूल म्हणजे लोकसहभाग, अमूल म्हणजे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, अमूल म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी प्रेरणा आणि अमूल म्हणजे मोठी स्वप्न. पुढील पिढीसाठी हे एक मोठं उदाहरण आहे.

सरकार आणि सहकारातील समन्वयाचे अमूल हे एक मॉडेल आहे. या प्रयत्नांमुळे आज आपण दुधाचे उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये आहोत. जगातील डेअरीमध्ये अमूल सध्या आठव्या क्रमांकावर आहे. आता आपल्याला पहिल्या क्रमांकावर यायचे आहे, अस टार्गेट मोदींनी दिली. त्यासाठी सरकारचे पूर्ण सहकार्य मिळेल, ही मोदी गॅरंटी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

R

PM Narendra Modi
Kamal Nath News : भाजपनं वाढवलं कमलनाथ यांचं टेन्शन, मतदारसंघातच पाडलं खिंडार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com