Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : मोदी आता घाबरलेत... काही दिवसांत स्टेजवर रडतील!

Rajanand More

Karnataka News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही नेत्यांच्या प्रचाराची धार अधिकच धारदार होत चालली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आता घाबरले असून, काही दिवसांतच त्यांच्या डोळ्यातून स्टेजवरच अश्रू येतील, असे विधान केले आहे.

कर्नाटकातील (Karnataka) एका सभेत बोलताना राहुल यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) चोवीस तास तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या दिवशी पाकिस्तान आणि चीनच्या गोष्टी करतात. दुसऱ्या दिवशी थाळी वाजवायला सांगतील, मोबाईलची फ्लॅश लाइट लावायला सांगतील. (Lok Sabha Election 2024)                                                 

आता मोदी घाबरलेले दिसत आहेत. त्यामुळे काही दिवसांत ते स्टेजवरच डोळ्यातून अश्रू काढतील, असा टोलाही राहुल यांनी लगावला. मागील दहा वर्षांत त्यांनी गरिबांचा पैसा हिसकावून घेतला आहे. देशातील 70 कोटी लोकांकडे असलेल्या संपत्तीएवढी संपत्ती केवळ 22 लोकांना दिली. केवळ एक टक्के लोकं 40 टक्के संपत्ती नियंत्रित करत आहेत. काँग्रेस पक्ष बेरोजगारी आणि महागाई संपवून तुम्हाला भागीदारी देईल, असेही राहुल म्हणाले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींकडून हल्लाबोल

पंतप्रधान मोदींनी आज काँग्रेसवर (Congress) आरक्षण आणि वारसाहक्क करावरून पुन्हा निशाणा साधला. बिहारमधील सभेत बोलताना ते म्हणाले, धर्मावर आधारीत आरक्षण आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. सुप्रीम कोर्टाने धर्माधारित आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे काँग्रेस मागच्या दाराने ते आणू पाहत आहे. कर्नाटकात सर्व मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण दिले. संपूर्ण देशातही असे करण्याचा त्यांचा हेतू आहे.

वारसाहक्क कराच्या माध्यमातून काँग्रेस आणि आरजेडीकडून त्यांच्या व्होट बँकेसाठी तुमची संपत्ती लुटली जाईल. संपूर्ण देश चिंतेत आहे. प्रत्येक युवक आणि ज्येष्ठ पालकांना चिंता आहे. आता देश म्हणत आहे, काँग्रेसची लूट, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. त्यासाठी आरजेडी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून चालत आहे, असा जोरदार हल्ला मोदींनी चढवला.        

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT