Lok Sabha Election 2024 : हृदयविकाराचा झटका अन्..! मतदानाच्या रांगेतच डॉक्टरने वाचवले महिलेचे प्राण

Dr Ganesh Srinivasa Prasad : महिलेला कोसळलेली पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने धाव घेत त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Bengaluru News : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी बहुतेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या लक्षणीय होती. बंगळुरूतील अशाच एका मतदान केंद्रांवर लागलेल्या मतदारांच्या रांगेतील एक महिला अचानक कोसळली. सुदैवाने जवळ्याच दुसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या डॉक्टरांनी तिथे धाव घेत तपासणी केली. हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच, त्यांनी तातडीने ‘सीपीआर’ देत या महिलेचे प्राण वाचवले.

बंगळुरू येथील एका मतदान (Voting) केंद्रावर सकाळी ही घटना घडली आहे. नारायणा हेल्थ सेंटरमधील डॉ. गणेश श्रीनिवास प्रसाद (Dr Ganesh Srinivasa Prasad) हे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मतदारांच्या रांगेत उभे होते. या वेळी रांगेजवळच एक महिला उभी राहून पाणी पित होती. त्याचवेळी ती अचानक कोसळली. डॉ. प्रसाद यांच्यासह इतर मतदार तातडीने तिथे धावून गेले.

Lok Sabha Election 2024
Delhi Mayor Election : महापौर निवडणूक वादात; नायब राज्यपालांवर गंभीर आरोप

प्रसाद यांनीच या घटनेची माहिती ‘एक्स’वरून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतदारांच्या रांगेत उभे असताना एक महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने कोसळली. हृदयाचे ठोके जवळपास बंद पडले होते. मी तातडीने सीपीआर दिला. सुदैवाने काही मिनिटांत महिला शुद्धीत आली.  (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मीडियाशी बोलताना डॉ. प्रसाद म्हणाले, सीपीआर (CPR) दिल्यानंतर महिला शुद्धीत आली. त्यानंतर निवडणुकीच्या ड्यूटीवर असलेल्या काही जणांनी तिथे धाव घेत ज्यूस आणला. तोपर्यंत रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती. रुग्णवाहिकेने महिलेला रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, आज देशातील तेरा राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू आहे. मतदानाचा हा दुसरा टप्पा असून, त्यामध्ये राहुल गांधी, हेमा मालिनी, शशी थरूर, डीके सुरेश, तेजस्वी सूर्या, ओम बिर्ला, गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह अनेक मातब्बर उमेदवारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या होत्या.

R

Lok Sabha Election 2024
Supreme Court on EVM : EVM-VVPAT ची शंभर टक्के मोजणी नाहीच; सर्व याचिका फेटाळल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com