Rekha Patra, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : शक्ती स्वरूपा! मोदींचा संदेशखाली पीडितेला फोन; भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले. पीडित महिलांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याविरोधात आवाज उठवत कारवाईची मागणी केली हाेती. त्यानंतर भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी बंगालमध्ये या प्रकरणावरून रान उठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणातील पीडित महिलांची भेटही घेतली होती. त्यातील एका पीडित महिलेला भाजपने उमेदवारीही दिली आहे.

भाजपने (BJP) बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा (BJP Candidate Rekha Patra) यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली आहे. त्या संदेशखाली प्रकरणातील पीडित आहेत. आज पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना फोन करून संवाद साधला. मोदींनी त्यांना निवडणुकीची तयारी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या सहकाऱ्याविषयी विचारणा केली. तसेच त्यांचा उल्लेख 'शक्ती स्वरूपा' असा केला.

तुम्ही खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहात. तयारी कशी सुरू आहे, असे मोदी पात्रांना म्हणाले. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, मला खूप छान वाटत आहे. तुमचा हात माझ्या आणि संदेशखालीतील (Sandeshkhali Victims) सर्वच महिलांच्या डोक्यावर आहे, अशी भावना पात्रा यांनी व्यक्त केली.

आमच्यासोबत खूप मोठी घटना घडली आहे. केवळ संदेशखालीच नव्हे तर बसीरहाटमधील (Basirhat Lok Sabha Constituency) सर्व महिलांना याचा त्रास झाला. आम्ही आरोपींवर कारवाईची मागणी केली. आम्ही 2011 पासून मतदान करू शकलो नाही. आता या वेळी मतदान करू, अशी आशा असल्याचेही पात्रा यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींनी त्यांना निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. दरम्यान, बसीरहाट मतदारसंघातून तृणमूलने हाजी नुरुल इस्लाम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांचे तिकीट कापले आहे. संदेशखाली प्रकरणामुळेच त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संदेशखाली प्रकरणात तृणमूलचे नेते शाहजहान शेख याला अटक करण्यात आली असून, तो सध्या तुरुंगात आहे. संदेशखालीमध्ये बेकायदेशीरपणे जमीन बळकावणे आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप त्याच्यावर आहेत. येथील महिलांनीच त्याविरोधात आवाज उठवून अत्याचाराला वाचा फोडल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT