Election Commissioner Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : सस्पेन्स संपला; आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार...

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाला आज दोन नवीन निवडणूक आयुक्त मिळाले आहेत. त्यानंतर आयोगाकडून उद्याच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आयोगाकडून उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) नेते आणि निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhary) यांनी काल ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे दोघे निवडणूक आयुक्त असतील, असा काल दावा केला होता. पण त्यावेळी केंद्र सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर काल सायंकाळी दोघांच्या निवडीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले.

आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांच्या उपस्थितीत ज्ञानेश कुमार आणि संधू यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील काही तासांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आयोगाने राज्यांच्या निवडणूक तयारीचा (Election Timetable) आढावा नुकताच पूर्ण केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशभरातील निवडणूक निरीक्षकांची बैठकही नुकतीच घेण्यात आली आहे. नवीन निवडणूक आयुक्तांनी कामाला सुरुवात केली असून, आज देशभरातील निवडणुकीच्या तयारीवर महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर उद्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

दरम्यान, 2019 मध्ये निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्रात (Maharashtra) चार टप्प्यांत निवडणूक घेण्यात आली होती. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या दिवशी महाराष्ट्रात मतदान झाले होते, तर 23 मे रोजी मतमोजणी पार पडली होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT