Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात चार, तर देशभरात असू शकतात सात टप्पे; अशा होत्या 2019 च्या तारखा...

Election Commission of India News : निवडणूक आयोगाकडून 13 मार्चनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. सर्वच राजकीय पक्ष वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत.

Rajanand More

Lok Sabha Election Shedule : लोकसभा निवडणुकीच्या तारखांकडे सर्वच राजकीय पक्षांसह मतदारांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात 13 तारखेनंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक किती टप्प्यांत होणार, कोणत्या राज्यांत किती टप्पे असतील, मतदान आणि निकालाची तारखी कोणती असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Lok Sabha Election 2024)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सध्या देशभरात तयारीचा आढावा घेतला जात आहे. जम्मू-काश्मीर राज्यांत शेवट होणार असून, त्यानंतरच तारखा जाहीर होतील. त्यासाठी आणखी 20 ते 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 2019 च्या निवडणुकीप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सात टप्प्यांमध्ये निवडणूक (Election) घेतली जाऊ शकते. एक टप्पा कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो.

लोकसभा निवडणुकीचे टप्पे बहुतेक राज्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच जाहीर केले जाऊ शकतात. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, आसाम आदी राज्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यांमध्ये मतदान होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तामिळनाडू, केरळ, गुजरात, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होऊ शकते. पहिल्या ते सातव्या टप्प्यातील मतदान अनुक्रमे 11 मार्च, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे या दिवशी झाले होते.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली होती. पहिल्या टप्प्यात एकूण 48 पैकी सात मतदारसंघ होते, तर दुसऱ्या टप्प्यात 10, तिसऱ्या टप्प्यात 14 आणि चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघांत निवडणूक झाली होती. या वेळीही अशाचप्रकारे चार टप्प्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. टप्पानिहाय मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतात किंवा त्यात बदलही केला जाणार नाही.

असे होते महाराष्ट्रातील टप्पे –

पहिला टप्पा (ता. 11 एप्रिल) – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम.

दुसरा टप्पा (ता. 18 एप्रिल) – बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.

तिसरा टप्पा (ता. 23 एप्रिल) – जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी.

चौथा टप्पा (ता. 29 एप्रिल) – नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण मध्य.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT