AAP-Congress Alliance News : दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आतापर्यंत ईडीने त्यांना सात समन्स पाठवले आहेत. पण ते एकदाही हजर झालेले नाहीत. आता आपच्या नेत्यांनी मोठा दावा करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांना पुढील दोन-तीन दिवसांत अटक केली जाऊ शकते, असा दावा नेत्यांनी केला आहे. (Arvind Kejriwal News)
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर आपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना मोठा दावा केला. ते म्हणाले, भाजपमधील (BJP) नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे की, काँग्रेससोबत विविध राज्यांमध्ये आघाडी केल्यास अरविंद केजरीवाल जेरमध्ये जातील. काँग्रेससोबत (Congress) कोणतीही आघाडी न केल्यास केजरीवाल सुरक्षित राहतील. त्यांच्यासमोर हा एक मार्ग आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत केजरीवालांना अटक होईल, अशी माहिती आमच्याकडे आहे. आप (AAP) आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास अडचणी वाढतील, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे भाजप खूप निराश झाली आहे, पण काहीही झाले तरी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करू, असे भारद्वाज यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्लीसह सर्व राज्यांमध्ये आघाडीबाबत एकत्रितपणे घोषणा केली जाईल. आता जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबतची घोषणा होईल, असे भारद्वाज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर लवली यांनी गुरुवारी आप आणि काँग्रेसमधील आघाडीची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये सात जागा असून, काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीसह गुजरात, हरियाणा आणि गोव्यामध्येही दोन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये आपला दोन जागा मिळू शकतात, तर हरियाणा आणि गोव्यात प्रत्येकी एक जागा आपला दिली जाऊ शकते. पंजाबमध्ये मात्र दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.