Lok Sabha Election 2024  Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : कोणत्या राज्यात किती टप्प्यात होणार मतदान? वाचा सविस्तर...

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा सर्वात मोठा असून, एकाच दिवशी 22 राज्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि आसाममध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, चंदीगड, अंदमान निकोबार, दीव दमन, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोरम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये मतदान होणार आहे. या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

दोन ते चार टप्पे

कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये दोन टप्प्यांत, तर छत्तीसगड आणि आसाम या दोन राज्यांत तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. चार टप्प्यांत होणाऱ्या मतदानामध्ये ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

पाच व सात टप्पे

महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत मतदान होईल. सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्पे असतील. बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही सात टप्प्यांत निवडणूक होणार असल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.

टप्पानिहाय मतदान (कंसात मतदारसंघ) -

पहिला टप्पा – 19 एप्रिल (102)

दुसरा टप्पा - 29  एप्रिल (89)

तिसरा टप्पा – 07 मे (94)

चौथा टप्पा – 13 मे (96)

पाचवा टप्पा – 20 मे (49)

सहावा टप्पा – 25 मे (57)

सातवा टप्पा - 01 जून (57)

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कुठे मतदान?

*पहिला टप्पा - 19 एप्रिल -

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

*दुसरा टप्पा 26 एप्रिल -

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

* तिसरा टप्पा 7 मे -

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

*चौथा टप्पा 13 मे -

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

*पाचवा टप्पा 20 मे -

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT