EC press conference On Elections : लोकसभेसोबतच 'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा! काय आहेत वैशिष्ट्ये?

EC Commissioner Rajiv Kumar Election Announcement : शांततेत निवडणूक कार्यक्रम पार पडणे ही आपल्या निवडणूक आयोगाची परंपरा आहे.
EC press conference On Elections
EC press conference On ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Election Commission Announcement Elections News : भारतीय निवडणूक आयोगाने आजअखेर लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. या घोषणेनंतर संपूर्ण देशात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेसोबतच देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर केल्या आहेत. सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या टप्प्यात पार पडणार आहेत. (Latets Marathi News)

असा आहे निवडणूक कार्यक्रम -

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्याचे 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याचे 7 मे, चौथ्या टप्प्याचे 13 मे, पाचव्या टप्प्याचे 20 मे, सहाव्या टप्प्याचे 25 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकांचे निकाल होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

EC press conference On Elections
NCP Crisis News : अजितदादांच्या घड्याळाची टिकटिक थांबणार? सुप्रीम कोर्टाकडून मोठे संकेत

देशभरात कोणत्या टप्प्यात किती मतदारसंघ ?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार असून, 102 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 89 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार असून, त्यामध्ये 96 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49 जागांवर, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 जागांवर आणि 01 जून रोजी सातव्या टप्प्यांत 57 जागांवर मतदान होणार आहे.

EC press conference On Elections
Loksabha Election 2024 : अमरावतीत आनंदराव अडसूळ ठाम! शिवसैनिकांकडून व्हायरल बॅनरची चर्चा

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान -

26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 13 मे, 20 मे, 25 मे या तारखांना महाराष्ट्रात निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कुठे मतदान?

*पहिला टप्पा - 19 एप्रिल -

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

*दुसरा टप्पा 26 एप्रिल -

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

* तिसरा टप्पा 7 मे -

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

*चौथा टप्पा 13 मे -

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

*पाचवा टप्पा 20 मे -

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.

निवडणुकांची जय्यत तयारी -

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, "97 कोटी मतदार आहेत. निवडणुकांसाठी 10.5 लाख मतदान केंद्रे तयार आहेत. 1.5 कोटी कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत देशात 17 लोकसभा (Lok Sabha) निवडणुका झाल्या आहेत. शांततेत निवडणूक कार्यक्रम पार पडणे ही आपल्या निवडणूक आयोगाची परंपरा आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणुका घेणे आव्हानात्मक आहे, पण आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही या वेळी सर्व राज्यांचा दौरा करून निवडणुकांच्या तयारीबाबत आढावा घेतला आहे."

यंदाच्या निवडणुकांसाठी (Election) मतदार म्हणून 48.7 कोटी पुरुष, 47.1 कोटी महिला, 48 हजार ट्रान्सजेंडर, 19.74 कोटी तरुण मतदार आणि 82 लाख वृद्ध 85 वर्षांवरील आहेत. निवडणुकीदरम्यान 55 लाख ईव्हीएम यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी 10.5 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

"प्रत्येक बूथवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा असतील. प्रत्येक बूथवर पिण्याचा पाण्याची सोय असेल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे. रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध असतील. आम्हाला आशा आहे की सर्व तरुण आणि इंफ्लुएंसर्स मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी येतील आणि त्यांच्या मित्रांनाही सोबत घेऊन येतील," असे निवडणूक आयुक्त म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com