Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Raebareli Lok Sabha: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग, राहुल गांधींविरोधात मोठी फौज रिंगणात

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News: देशातील अनेक प्रतिष्ठीत लढतीमध्ये रायबरेली मतदारसंघाचा समावेश होतो. कारण या मतदारसंघांतून राहुल गांधी (Rahul Gandhi) निवडणूक लढवत आहेत. रायबरेली मतदारसंघाचे गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांनी नेतृत्व केले आहे. तर आता चौथी पिढी या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्याला घेरण्यासाठी भारतील जनता पक्षाने मोठी फौज कामाला लावली आहे. त्यामुळे या मतदारसंगादतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गांधी कुटुंबातील फिरोज गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी या आधी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे. या मतदारसंघात एकदाच इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा पराभव झाला आहे. अन्यथा इतर कोणीही या मतदारसंघातून पराभूत झालं नव्हतं. अशातच आता 2024 च्या लोकसभेसाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) या मतदारसंघातून आपले नशीब अजमावत आहेत. हा मतदारसंघ गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सध्या इथे काँग्रेसची (Congress) संघटनात्मक बाजू कमजोर झाली आहे. कारण या मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघ समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत तर उरलेला एक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे सध्या इथला एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसती ताकद नसल्याचं चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2004 पासून सोनिया गांधी यांनी या मतदारसंघात नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरीही या मतदारसंघातील मतदारांची साक्षरता केवळ 57 टक्के एवढीच आहे. अशातच आता राहुल गांधींनी इथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी सध्या या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर राहुल गांधीच्या विरोधातील ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने या मतदारसंघात जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे.

भाजपने (BJP) उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) प्रताप सिंह यांनीच जोरदार लढत दिली होती. भाजपचे मताधिक्य 17 टक्क्यांनी वाढविण्यात दिनेश प्रताप सिंह यांना यश आले होते. महत्वाची बाब म्हणजे दिनेश प्रताप सिंह हे 2018 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिनेश प्रताप सिंह यांची भाजपने उत्तर प्रदेश विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला चांगलेच यश मिळवून दिले होते.

दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक

तर सध्या रायबरेलीत भाजपचे अनेक नेते तळ ठोकून आहेत. प्रत्येक समाजातील नेत्यांना पक्षाने वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. या मतदारसंघात दलित समाजाची मते 30 टक्के तर मुस्लिम समाजाची मते 12 टक्के मते आहेत. ही मते नेहमीच या मतदारसंघात निर्णायक राहिली आहेत. गेल्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षानेन उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी त्यांनी ठाकूर प्रसाद यादव यांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेसला जड जाणार की भाजपला? हे निकालानंतरचं कळेल.

रायबरेली मतदासंघातील 2019 च्या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे

रायबरेली मतदासंघातील एकूण मतदार - 18 लाख

उमेदवारांना मिळालेली मते

सोनिया गांधी (काँग्रेस) - 5,343,918 (55.80 टक्के)

दिनेश प्रताप सिंग (भाजप) - 3,67,740 (38.36 टक्के)

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT