New Delhi News : दिल्लीतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाला (Delhi BJP Office) आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी दुपारी साड चार वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील अग्निशमन दलाला आगीची घटना कळवण्यात आली होती. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे कार्यालयत दिल्लीती पंडित पंत मार्गावर आहे.
भाजप पक्ष कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मीटर बॉक्समधील शॉर्ट सक्रीटमुळे ही आग लागली. सव्वा चार वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. पंधरा मिनिटांतच फायर ब्रिग्रेडची टीम कार्यालयात पोहचली. त्यानंतर काही मिनिटांतच आग नियंत्रणात आली. कार्यालयातील वीज यंत्रणा सध्या बंद ठेवण्यात आली आहे. या आगीमध्ये कार्यालयातील मालमत्तेचे नुकसान झालेला नाही. तसेच कोणीही जखमी झाले नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, दिल्लीतील इन्कम टॅक्स विभागाच्या (Income Tax Office) ऑफिसला मंगळवारी (ता. 14) आग लागली होती. आग नियंत्रणात आणण्यासाठी फायरब्रिगेडच्या दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळात आग आटोक्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.