BJP Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : तावडेंनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत मोठी चूक; दुसरी यादी केली प्रसिध्द

BJP Candidate List : भाजपने काल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण आसाममधील उमेदवारांची यादी जाहीर करताना चूक झाली आहे.

Rajanand More

New Delhi News : भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये मोठी चूक केली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी यादी जाहीर करताना आसाममधील 11 उमेदवारांची घोषणा केली होती. पण पक्षाकडून मतदारसंघांची नावे व क्रमांक चुकवण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर भाजपकडून आज ही चूक सुधारण्यात आली असून नव्याने दुसरी प्रसिध्द करण्यात आली आहे.

भाजपकडून (BJP) काल 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आसाममधील (Assam) 14 पैकी 11 उमेदवारांचा समावेश आहे. पण ही यादी जाहीर करताना पक्षाकडून मतदारसंघांची जुनीच नावे दिली होती. निवडणूक आयोगाने (Election Commission) मागील वर्षीच परिसीमन केले आहे. त्यामुळे काही मतदारसंघाची रचना आणि नावे बदलण्यात आली आहेत.

परिसीमन केल्यानंतर पहिलीची लोकसभा निवडणूक होत आहे. भाजपच्या यादीत जुन्या रचनेप्रमाणेच मतदारसंघ व उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. ही चूक सुधारून आज नवीन यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघांची नावे, क्रमांक व तेथील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन यादीनुसार, दिलीप सैकिया हे दरांग उदलगिरीमधून, अमर सिंग तिस्सो हे दीफूमधून तर रंजीत दत्ता हे तेजपूरमधून निवडणूक लढवतील. नागांवमधून सुरेश बोरा आणि कामाख्या प्रसाद तासा यांना काजीरंगामधून तिकीट देण्यात आले आहे. मंगलदाई आणि कलियाबोर हे मतदारसंघ आता नाहीत. त्यांचा उल्लेख नवीन यादीतून काढण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार रामेश्वर तेली यांचे तिकीट कापून डिब्रुगड मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मैदानात उतरवण्यात आले. भाजपने मित्रपक्ष असलेल्या असम गण परिषदेला दोन जागा दिल्या आहेत. एक जागा बोडोलँड क्षेत्राचे प्रमुख प्रोमोड बोरो यांचा पक्ष युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला सोडली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT