Rajasthan News : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर होण्याआधी 195 उमेदवारांची नावे जाहीर करत मोठी आघाडी घेतली आहे. पण आता पक्षाला नाराज नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. तिकीट कापलेले विद्यमान खासदार, उमेदवारी न मिळालेले पदाधिकारी यांची नाराजी आता समोर येऊ लागल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.
उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आज भाजपला (BJP) दोन धक्के बसले आहेत. भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी जाहीर झालेली उमेदवारी नाकारली आहे. तर विद्यमान खासदार डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी उमेदवारी नाकारल्याने थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्याआधी राजस्थानमधूनही भाजपच्या नेत्यानी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
भाजपने काल राजस्थानमधील (Rajasthan) 15 उमेदवारांची घोषणा केली. त्यांनी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माजी खासदार जसवंत सिंह बिश्नोई (Jaswant Singh Bishnoi) यांनी एक्स हॅंडलवर म्हटले आहे की, कोण ऐकणार, कुणाला सांगायचे, त्यामुळे गप्प बसतो. आमच्यावर आपलेच नाराज होऊ नयेत, म्हणून गप्प बसतो… अशा शब्दांत बिश्नोई यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच नाराजी वक्त केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जोधपूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांनाच पुन्हा उमदेवारी देण्यात आली आहे. त्यानंतर बिश्नोई यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या पोस्टनंतर त्यांनी काही वेळात दुसरी पोस्ट करून पक्षाला सूचक इशारा दिला आहे. ‘मी निर्णय घेतला आहे की, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मी एक पोस्ट लिहिन. त्यानंतर भविष्यात कोणत्याच प्रकारची पोस्ट लिहिणार नाही,’ असे बिश्नोई यांनी म्हटले आहे.
बिश्नोई यांना विधानसभेचे तिकीटही नाकारण्यात आले होते. ते 1999 पासून 2009 पर्यंत जोधपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्या नाराजीने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. आगामी निवडणुकीत बिश्नोई हे अपक्ष म्हणून उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ते नेमका कोणता निर्णय घेणार, हे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.