BJP Lok Sabha Candidates Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या 2019 मधील पहिल्या उमेदवारी यादीत होती 'ही' सोळा नावे... 2024 मध्ये कोण?

Rajanand More

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आता काही दिवसच उरले असून सर्वच पक्षांनी जागावाटप अन् उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. कोणत्या नेत्याचे नाव उमेदवारांच्या पहिल्याच यादी येणार, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता आहे. भाजपकडून काही दिवसांत शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, 2019 ची पहिली यादी भाजपकडून 21 मार्चला प्रसिध्द करण्यात आली होती. या यादी महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांसह 184 उमेदवारांची नावे होती.

महाराष्ट्रासह (Maharashtra) सर्वच राज्यांमध्ये उमेदवारी निश्चित करण्यासाठी नेत्यांची लगबग, बैठका सुरू आहेत. भाजपकडून (BJP) अजूनही इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याआधी उमेदवारी निश्चित झालेल्या देशभरातील शंभर उमेदवारांची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्याकडे भाजपच्या नेत्यांचा कल असल्याचे समजते.

पहिल्या यादीत पहिलं नाव साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) असेल. 2019 च्या यादीत पंतप्रधान मोदींसह अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह, धर्मेंद्र कुमार, हेमा मालिनी, स्मृती इराणी, किरण रिजिजू, प्रल्हाद जोशी, अनंतकुमार हेगडे यांसह इतर नेत्यांची नावे होती. तर या यादीत महाराष्ट्रातील सोळा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मधील पहिल्या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी (Nitin Gadkari), रावसाहेब दानवे, हीना गावित, सुजय विखे, डॉ. सुभाष भामरे, रक्षा खडसे, संजय धोत्रे, रामदास तडस, अशोक नेते, हंसराज अहिर, कपिल पाटील, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, सुधाकर श्रृंगारे आणि संजय पाटील यांचा समावेश होता.

2024 च्या पहिल्या यादीत कोण असेल?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्रात अजूनही महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र, काही जागांवर एकमत झाले आहे, उमेदवारही जवळपास निश्चित मानले जात आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत गडकरींसह दानवे, सुजय विखे, हीना गावीत, कपिल पाटील, पूनम महाजन (Poonam Mahajan), गोपाळ शेट्टी आदी नेत्यांच्या नावाचा समावेश असू शकतो. यांसह मुंबईतील काही नावेही जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून त्यांची नावेही पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT