Madhya Pradesh News : मागील अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ कमलनाथ (Kamal Nath News) आणि पुत्र खासदार नकुलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचा दावा भाजपकडूनही केला जात होता. पण कमलनाथ यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट करून त्यावर पडदा टाकला. आता पुन्हा एकदा त्यांचं एक विधान चर्चेत आलं आहे.
कमलनाथ यांनी बुधवारी त्यांच्या छिंदवाडा (Chhindwara) या बालेकिल्ल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद झाला. छिंदवाडा आणि कमलनाथ यांचे भावनिक नाते असल्याने ते कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणे बोलले. यावेळी बोलताना त्यांनी थेट निरोपाची भाषा करत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
कमलनाथ म्हणाले, तुम्हाला कमलनाथ यांना निरोप द्यायचा असेल तर ती तुमची मर्जी असेल. मीही सोडायला तयार आहे. मी स्वत:ला तुमच्यावर लादू इच्छित नाही. तुम्हाला काय वाटते, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. मी भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या अफवा भाजप पसरवत आहे. भाजपमध्ये जाणार, असे मी कधीच म्हणालो नाही. या गोष्टींपासून तुम्ही सावध राहायला हवे, असे कमलनाथ कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून नऊवेळा लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजयी झाले आहे. सध्या ते आमदार असून त्यांचे पुत्र नकुलनाथ हे काँग्रेसचे (Congress) खासदार आहेत. पुन्हा एकदा त्यानांच या मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमलनाथ यांनी मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. यापार्श्वभूमीवर ते मतदारांना भावनिक आवाहन करत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप नकुलनाथ (Nakul Nath) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांनीच काही दिवसांपुर्वी आपणच उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. तसेच एक्स हँडलवरून काँग्रेसचा उल्लेखही काढून टाकला होता. तेव्हापासून दोघेही पिता-पुत्र भाजपवासी होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, कमलनाथ यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.