Abhijit Gangopadhyay Sarkarnama
देश

Abhijit Gangopadhyay News : न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेचं तिकीटही मिळणार

Lok Sabha Election 2024 : अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. त्याचदिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

Rajanand More

West Bengal Political News :  कोलकाता हायकोर्टातील न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर अभिजित गंगोपाध्याय यांनी दोन दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) तिकीटही मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राजीनामा दिल्यानंतर गंगोपाध्याय यांनी भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे जाहीर केले होते.

पश्चिम बंगाल भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार, नेते सुवेंदू अधिकारी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून ते राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा होती. याबाबत त्यांनीच मीडियाशी बोलताना संकेत दिले होते. राजीनामा देण्याआधीच त्यांनी राजकारणात येणार असल्याचे बोलल्याने वादही निर्माण झाला होता.

गंगोपाध्याय यांना बंगालमधील तुमलूक मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असून, मागील तीनही निवडणुकांमध्ये (Election) या पक्षाचाच उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे गंगोपाध्याय यांना या मतदारसंघात खूप मेहनत घ्यावी लागू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायाधीशपदावर असताना गंगोपाध्याय यांनी बंगालमधील शिक्षक भरतीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या या आदेशाला स्थगिती मिळाली होती. याबाबत ते मीडियाशी बोलल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांकडे सोपवण्यात आली होती.

भाजपचे कौतुक अन् तृणमूलवर टीका

न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर गंगोपाध्याय यांनी तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्षातील बहुतेक सदस्य अज्ञानी आहेत. त्यामुळेच ते आपल्यावर टीका करतात. ते काय म्हणतात याला मी महत्त्व देत नाही. भाजप हा तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसपेक्षा चांगला पक्ष आहे.

तृणमूल हा राजकीय पक्ष नाही. तो एक क्लब आहे, तर काँग्रेस (Congress) हा कौटुंबिक जमीनदारांचा पक्ष आहे. टीएमसीपेक्षा काँग्रेस आणि भाजप चांगला आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या पक्षांमध्ये टीएमसी हा सर्वात भयानक पक्ष असल्याची टीका गंगोपाध्याय यांनी केली होती.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT