KS Eshwarappa, BS Yediyurappa Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजपमध्ये बंडखोरी; बड्या नेत्याचं थेट येडियुरप्पांना आव्हान

KS Eshwarappa : ईश्वरप्पा यांच्या या भूमिकेमुळे कर्नाटकमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाच आव्हान दिले आहे.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) विविध पक्षांना अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमध्ये भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी थेट माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाच आव्हान दिले आहे. दिल्लीत जाऊनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न झाल्याने ईश्वरप्पा यांनी आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हे कर्नाटकातील (Karnataka) भाजपचे बडे नेते आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. काल ते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते, पण तिथे त्यांच्या पदरी निराशा पडली. शाह यांची भेट न झाल्याने त्यांनी येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

कर्नाटकातील शिवमोगा मतदारसंगातून ईश्वरप्पा बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी यापूर्वीच याबाबत संकेत दिले होते. ते म्हणाले, आता चर्चा नाही. हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार असून, शिवमोगातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना पदावरून हटवण्याची ईश्वरप्पा यांची प्रमुख मागणी आहे. त्यांना पदावरून हटवल्यानंतरच आपण माघार घेऊ, असेही ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी येडियुरप्पा यांच्या कुटुंबावरही हल्ला चढवला.

कर्नाटक भाजपची सत्ता पूर्णपणे एका कुटुंबाकडे आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदूच्या भावना त्यामुळे दुखावल्या जात आहेत, असेही ईश्वरप्पा यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी काँग्रेसमधील फॅमिली कल्चरवर बोलतात, पण दुसरीकडे कर्नाटकातील भाजपही एकाच कुटुंबाच्या हातात आहे. त्या कुटुंबातून पक्षाला मुक्त करायला हवे. कार्यकर्त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे, असे ईश्वरप्पा म्हणाले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT