Dhananjay Singh  Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात बंडखोरीच्या तयारीत असलेल्या नेत्याला सात वर्षांची शिक्षा

Dhananjay Singh News : धनंजय सिंह यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली होती, पण आता त्यांना शिक्षा झाल्याने तयारीवर पाणी फिरले आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघाचे माजी खासदार आणि संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय महासचिव धनंजय सिंह यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपहरण प्रकरणात विशेष न्यायालयाने मंगळवारी सिंह यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत सिंह हे जौनपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवारी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात निवडणुकीत बंडखोरीच्या तयारीत होते.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच उमेदवारी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत जौनपूर मतदारसंघाचाही समावेश होता. धनंजय सिंह यांनी त्याआधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती, पण भाजपने (BJP) उमेदवार जाहीर केल्याने त्यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे एनडीएमध्ये बंडखोरीची चिन्हे होती, पण त्याआधीच सिंह यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

जौनपूरमधील लाइन बाजार पोलिस ठाण्यात सिंह यांच्या विरोधात नमामी गंगे प्रकल्पाचे मॅनेजर अभिनव सिंघल यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना मे 2020 मध्ये घडली होती. अभिनव यांचे अपहरण करून त्यांना सिंह यांच्या घरी डांबून ठेवण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय सिंह (Dhananjay Singh) व त्यांचा साथीदार विक्रम याला पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. काल विशेष कोर्टाने या प्रकरणात दोघांनाही दोषी धरत निकाल राखून ठेवला. आज कोर्टाने निकाल देत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सिंह यांचे राजकीय भवितव्यच आता पणाला लागले आहे.

कृपाशंकर सिंह यांचा मार्ग सुकर

दरम्यान, भाजपने जौनपूर मतदारसंघातून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय सिंह यांनी सोशल मीडियात आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘मित्रांनो, तयार राहा, आता लक्ष्य फक्त लोकसभा 73, जौनपूर’, असे म्हणत धनंजय सिंह यांनी बंडखोरीचे संकेत दिले होते. जेडीयू (JDU) हा एनडीएसोबत असल्याने कृपाशंकर सिंह यांना त्यांच्या बंडखोरीचा फटका बसला असता. धनंजय सिंह यांची मतदारसंघात मोठी ताकद आहे. पण आता ते तुरुंगात गेल्याने कृपाशंकर सिंह यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT