Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघ म्हणजे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा बालेकिल्ला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत (Lok Sabha Election 2024) चौधरी कुटुंबाचे वर्चस्व या मतदारसंघात होते. पण या निवडणुकीत पुणे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी इतिहास घडवला. चौधरींच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 2019 ची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. पण त्यात सत्यपाल सिंह यांचा पत्ता भाजपने चौधरी यांच्यासाठीच कापला आहे.
सत्यपाल सिंह (Satyapal Singh) हे 1980 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्त असताना त्यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात (Politics) प्रवेश केला. ते 2015 मध्ये सेवानिवृत्त होणार होते. मुंबईप्रमाणेच (Mumbai) त्यांनी पुणे (Pune), नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीटही मिळाले. उत्तर प्रदेशातील बागपत या मतदारसंघातून त्यांनी तिकीट देण्यात आले होते.
सत्यपाल सिंह हे मुळचे बागपतमधील बासौली गावातील आहेत. निवडणुकीत त्यांच्यासमोर राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) नेते अजित सिंह यांचे कडवे आव्हान होते. पण हे आव्हान मोडून काढत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. अजित सिंह तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही जयंत चौधरींचा (Jayant Chaudhary) पराभव करत सत्यपाल सिंह पुन्हा लोकसभेत गेले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदी सरकारच्या (Modi Government) पहिल्या कार्यकाळात सिंह यांच्यावर शिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. 2024 च्या निवडणुकीत सत्यपाल सिंह हॅट्ट्रिक करतील, अशी चर्चा होती. पण भाजपने ही जागा चौधरींच्या राष्ट्रीय लोकदलासाठी सोडली आहे. या पक्षाकडून उमेदवारही घोषित करण्यात आल्याने सिंह यांचे तिकीट कापल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंह यांनी सलग दोन्ही निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्याच चौधरींसाठी भाजपकडून मतदारसंघ सोडण्यात आला आहे.
उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मीडियाशी बोलताना सत्यपाल सिंह म्हणाले, पक्षाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. बागपतसाठी पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत मी आहे. मी पक्षाचा सच्चा आणि समर्पित सैनिक आहे. या निर्णयामुळे लोकांमध्ये निराशा आहे, कारण त्यांनी 60-70 वर्षांत पहिल्यांदाच विकास पाहिला. पक्षाने जो निर्णय घेतलाय, तो विचारपूर्वक घेतला असावा, हे लोकांना समजेल. यापुढे नेतृत्वाकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे काम करू, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.