Narendra Modi, Arvind kejriwal Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : नवऱ्यानं मोदी-मोदी केलं तर..! केजरीवालांचा महिला मतदारांना अजब सल्ला

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर देशभरात विविध पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा करत आहेत. आपल्याच पक्षाला मतदान करण्याबाबत आवाहन करताना मतदारांना अजब सल्लेही देत आहेत. असाच एक सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांना दिला आहे.

दिल्ली सरकारने (Delhi Government) नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये 18 वर्षांपुढील सर्व महिलांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचा निधी देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर शनिवारी केजरीवालांनी (Arvind Kejriwal) महिलांशी संवाद साधला. नवऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नावाने घोषणा दिल्यास त्यां रात्रीचे जेवण देऊ नका, असा सल्ला केजरीवालांनी यावेळी दिला.

केजरीवाल पुढे म्हणाले, अनेक पुरूष पंतप्रधान मोदींच्या नावाच्या घोषणा देतात. पण तुम्हाला हे बरोबर करायचे आहे. तुमच्या पतीने मोदींचे नाव घेतले तर तुम्ही त्यांना जेवण देऊ नका. तुमच्या घरातील सदस्यांना आप आणि माझे समर्थन करण्याची शपथ घ्यायला सांगा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या महिला भाजपचे (BJP) समर्थन करतात, त्यांना सांगा की केवळ तुमचा भाऊ केजरीवाल तुमच्यासाठी उभा राहील. त्यांना सांगा, वीज मोफत केली आहे. बसचे तिकीट मोफत देत आहे आणि आता महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे. त्यांच्यासाठी भाजपने काय केले. मग भाजपला मतदान का करायचे? यावेळी केजरीवालांना मतदान करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

राजकीय पक्षांकडून (Political Parties) महिलांना काही पदे दिली जात होती आणि महिला सक्षमीकरणाचा डंका पिटला जात होता. महिलांना पदे मिळू नये, असे मी म्हणत नाही. पण त्यांना मोठी मदे मिळायला हवीत. निवडणुकीत तिकीटे मिळायला हवी. त्यांना सर्वकाही मिळायला हवे. पण केवळ दोन-चार महिलांनाच त्याचा फायदा होता. इतर महिलांचे काय, असा सवाल उपस्थित करून केजरीवालांनी विरोधी पक्षांवर टीका केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT