Nirmala Sitharaman, S jaishankar Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजप सीतारमण, जयशंकर यांना उमेदवारी देण्याचे धाडस करणार का? जुन्या मित्राकडून चॅलेंज

Rajanand More

Chennai News : लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातूनही या वेळी जागा वाढतील, असा विश्वास आहे. तमिळनाडूमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवत मतदारांना सादही घातली. राज्यात या वेळी मोठा बदल दिसेल, असा दावा भाजपचे स्थानिक नेते करत आहे. त्यानंतर भाजपच्या जुन्या मित्रपक्षाने चॅलेंज दिले आहे.

जनाधार वाढल्याचा एवढाच विश्वास असेल तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आणि एस. जयशंकर यांना तमिळनाडूतील कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असे चॅलेंज अण्णाद्रमुकने भाजपला (BJP) दिले आहे. सीतारमण व जयशंकर हे सध्या कर्नाटक व गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहेत. दोघेही तमिळनाडूतील आहेत.

अण्णा द्रमुकचे (AIDMK) ज्येष्ठ नेते के. पी. मुनुसामी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजपला आव्हान दिले. ते म्हणाले, 'राज्यात भाजपचा जनाधार वाढल्याचा दावा या पक्षाचे नेते करत आहेत. असे असेल तर भाजपने निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आणि एस. जयशंकर यांना कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी द्यावी.' या आव्हानाला भाजप नेते कसे उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुनुसामी यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांतील दुरावा प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्णा द्रमुकने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात भाजपला एकही मोठा मित्रपक्ष नाही. याचा फटका थेट लोकसभेच्या निवडणुकीत बसणार आहे. भाजपने केवळ तमिळ मनिला काँग्रेसशी आघाडी केली आहे.

भाजपकडून अजूनही अण्णा द्रमुकबाबत आशावादी असल्याचे चित्र होते, पण नेत्यांच्या विधानामुळे भाजपला त्यांची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत राज्यातील 39 जागांपैकी एनडीएला केवळ एकच जागा मिळाली होती, तर डीएमके-काँग्रेस (Congress) आघाडीला 38 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपसमोर या वेळीही मोठे आव्हान आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT