Lok Sabha Election 2024 : उमेदवारांच्या पहिल्याच यादीत मोदी-शाह देणार धक्के?

BJP Candidates List : भाजपच्या शंभर उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कुणाचे नाव असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
PM Narendra Modi, Amit Shah
PM Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच देशभरातील जवळपास 300 उमेदवारांची नावे जाहीर करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे, तर शंभर उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाऊ शकते. या यादीमध्ये भाजप काही विद्यमान खासदारांना धक्का देऊ शकते. तसेच काही सेलिब्रिटी, बड्या नेत्यांना लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे.  

भाजपने (BJP) 'मिशन 400+' साध्य करण्यासाठी प्रत्येक आघाडीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारांबाबत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री भाजप मुख्यालयात झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. पहाटे तीन वाजता ही बैठक संपली.

PM Narendra Modi, Amit Shah
PM Modi : नेमके झाले तरी काय ? मोदींनी पहाटे 3 वाजता पक्ष कार्यालय सोडले !

बैठकीमध्ये पहिल्या शंभर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. इतर अनेक राज्यांतील उमेदवारांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रामुख्याने उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या उत्तरेकडील प्रमुख राज्यांवर भाजपचे विशेष लक्ष आहे. तसेच दक्षिण भारतातून अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी बडे नेते, सेलिब्रिटींना मैदानात उतरवले जाऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्योतिरादित्य, शिवराज सिंह मैदानात?

मध्य प्रदेशातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya Scindia) यांना ग्वाल्हेर मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना विदिशीतून लोकसभेच्या मैदानात उतरवले जाऊ शकते. प्रज्ञा ठाकूर यांच्यासह काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाईल, अशी चर्चा आहे. इंदौर, भोपाळ, नर्मदापूर यांसह आणखी काही जागांवर उमेदवार बदलले जाऊ शकतात. उत्तर प्रदेशातही अनेक विद्यमान खासदारांना नारळ दिला जाऊ शकतो.

दिल्लीत चार मतदारसंघांत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. दिल्लीत एकूण सात जागा आहेत. गौतम गंभीर, मीनाक्षी लेखी, डॉ. हर्षवर्धन आणि हंस राज हंस यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

पहिल्या यादीत महाराष्ट्रातील कोण?

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातून (Maharashtra) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुजय विखे, कपिल पाटील, पूनम महाजन, हीना गावित यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो, असे संकेत दिले जात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी सोबत असल्याने अद्याप जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

R

PM Narendra Modi, Amit Shah
Lok Sabha Election 2024 : वाराणसीतून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी; यूपीतील तब्बल 74 जागा भाजप लढवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com