Sharad Pawar, Rahul Gandhi, Nitish Kumar Sarkarnama
देश

India Alliance News : पवार, राहुल, खर्गे, ममता की नितीशकुमार? आघाडीत PM पदाचा चेहरा कोण असावा? सर्व्हेत 'या' नावाला पसंती

Sachin Fulpagare

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असावा? असा प्रश्न 'इंडिया' आघाडीच्या बैठकीनंतर उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावरून आता जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीत मंगळवारी 19 डिसेंबरला 'इंडिया' आघाडीची बैठक झाली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असावा? या मुद्द्यासह इतर काही राजकीय प्रश्नांवर एबीपी न्यूज-सी वोटरने सर्व्हे केला. त्यात चकित करणारे आकडे समोर आले. 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा? या प्रश्नावर सर्व्हेत सहभागी असलेल्या सर्वाधिक 27 टक्के लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतले. 14 टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे, 12 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर 10 टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नावाला पसंती दिली.

याच प्रश्नावर 8 टक्के लोकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणि 5 टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला पसंती दिली. 24 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असे म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

INDIA आघाडीत पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असावा?

राहुल गांधी - 27 टक्के

मल्लिकार्जुन खर्गे - 14 टक्के

अरविंद केजरीवाल - 12 टक्के

नितीशकुमार - 10 टक्के

ममता बॅनर्जी - 8 टक्के

शरद पवार - 5 टक्के

माहिती नाही - 24 टक्के

मल्लिकार्जुन खर्गेंना आघाडीचे संयोजक बनवले पाहिजे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यात 44 टक्के लोकांनी होकार दिला तर 34 टक्के लोकांनी नाही म्हटले. 22 टक्के लोकांनी माहिती नसल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT