Loksabha Election : इंडिया आघाडीचे जागावाटप 'या' कारणामुळे रखडले; जानेवारीत चर्चा होणार

India allince : यावर लवकरच मार्ग काढला जाणार आहे.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभव झाला. त्यामुळे विरोधकाच्या इंडिया आघाडीचे ऐक्य सोपे होईल, अशी आशा होती. मात्र, विरोधकांचे प्रामाणिक ऐक्य आणि जागावाटप सुरळीत व्हायचे असेल तर असेल 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढलेल्या काही जागांवर काँग्रेसला पाणी सोडावे लागणार आहे. या जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी काँग्रेसला करावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जागावाटप रखडले आहे. यावर लवकरच मार्ग काढला जाणार आहे. त्यानंतरच इंडिया आघाडीतील जागावाटप करण्यात येणार असल्याचे समजते.

राज्य पातळीवर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावयास हवा होता. मात्र, तसे झाले नाही उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये नितीशकुमार, (Nitishkumar) लालूप्रसाद यादव, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डावे पक्ष या साऱ्यासाठी काँग्रेस चार पावले मागे यायला तयार झाल्यास त्याठिकाणी जागावाटपाचे सूत्र ठरणार आहे.

India Alliance
Modi Government CEC Bill : मोदी सरकारनं हवं तेच केलं, वादग्रस्त विधेयक लोकसभेत मंजूर!

महाराष्ट्रातील उदाहरण घेतले तर 48 मतदार संघातील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कसे जागावाटप होणार आहे, याचा काहीच सुगावा अद्याप लागलेला नाही. हे तीन पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वनची बहुजन आघाडीला सॊबत घेणार की नाही यावर अवलंबुन असणार आहे. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र काही ठरलेले नाही. इंडिया आघाडीने मलिकार्जुन खरगे यांच्या रूपाने पहिला दलित पंतप्रधान मिळण्याची संधी आहे. काँग्रेसने दोनदा गमावली आहे. त्यामुळे आता सामाजिक दृष्टीने असा उमेदवार देणे हे चांगली राजकीय खेळू होऊ शकते. मात्र, ते सर्वांनी मिळून एकदिलाने करायला हवी होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडी होणार आक्रमक

येत्या काळात इंडिया (India allince) आघाडीने आक्रमक होण्याचे ठरवले आहे. 22 डिसेंबरला विरोधक देशभरात निदर्शने करणार आहेत. विशेषतः संस्थेत झालेल्या खासदार निलंबन प्रकरणावरून हे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीने प्रतिक्रियात्मक आंदोलने करण्याऐवजी ठोस कार्यक्रम घेऊन आंदोलन करण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधक जनतेकडे एकत्रित ताकदीने कसे जाणार इकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by- Sachin Waghmare)

India Alliance
India Alliance : 'इंडिया' आघाडीत वितुष्ट? नितीश कुमार नाराज...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com