Vikramaditya Singh, Kangana Ranaut Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : कंगनाकडून विक्रमादित्य सिंह यांच्याविषयी मोठा दावा; पुन्हा तापलं राजकारण

Kangana Ranaut News : भाजपने कंगना रनौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

Rajanand More

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाकडे (Lok Sabha Election 2024) सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने या मतदारसंघातून प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौतला उतरवले आहे. कंगनाचा या मतदारसंघातील प्रचार जोरदार सुरू आहे. विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत ती मतांचा जोगवा मागत आहे. आज कंगनाने काँग्रेसचे नेते व मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्याबाबत मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाणे आले आहे.

राज्यसभा निवडणुकीदरम्यान (Rajya Sabha Election) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेसच्या (Congress) काही आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) त्यांना भेटण्यासाठीही गेले होते. हे आमदार त्यांच्या गोटातील असल्याची चर्चा होती. सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.

कंगनाने (Kangana Ranaut) शुक्रवारी प्रचारादरम्यान सिंह यांच्याविषयी मोठा दावा करताना म्हटले की, ‘विक्रमादित्य सिंह यांनी दिल्लीत भाजप (BJP) मुख्यालयात चक्कर मारली आहे. लवकरच ते आमच्या टीममध्ये सहभागी होऊ शकतात.’ कंगनाचा हा दावा आणि विक्रमादित्य यांची बंडखोर आमदारांशी असलेली जवळीक, यामुळे तकवितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून अद्याप मंडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी विक्रमादित्य हेच प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या आई सध्या या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून सध्या कंगनाविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, कंगनाकडून विक्रमादित्य सिंह यांनाच टार्गेट केले जात आहे. त्यामुळे तेच काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. सिंह यांच्यावर टीका करताना कंगनाने त्यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला होता. दिल्लीत एक मोठा पप्पू असून इथे छोटा पप्पू असल्याचे म्हटले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT