New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या सत्तेत आल्यास संविधान आणि लोकशाहीसमोर संकट निर्माण होईल, अशी टीका काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून केली जात आहे. कर्नाटकातील भाजपचे खासदारच त्यासाठी निमित्त ठरले आहेत. त्यावरून आज पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024)
राजस्थानातील बाडमेर येथील प्रचार सभेत मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसला धारेवर धरले. ते म्हणाले, एससी, एसटी, ओबीसींसोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस (Congress) आज जुने कॅसेट वाजवत आहे. निवडणूक आली की संविधानाच्या नावावर खोटे बोलण्याची विरोधकांची फॅशन बनली आहे.
देशाचे संविधान (Indian Constitution) हे सरकारसाठी सर्वकाही आहे. उलट काँग्रेसने देशात आणीबाणी लागू करत संविधान संपवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) स्वत: आले तरी संविधान बदलू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले. उलट काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत हरवले. त्यांना भारतरत्न मिळू दिले नाही, आज तेच मोदींवर टीका करण्यासाठी संविधानाचा आसरा घेत असल्याची टीका मोदींनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जर काँग्रेससाठी संविधान एवढेच महत्त्वाचे होते तर त्यांनी संपूर्ण देशात कलम 370 रद्द होईपर्यंत त्याची अंमलबजावणी का होत नव्हती. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आंबेडकरांचा आत्मा मोदींना आशीर्वाद देत असेल, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा पुनरुच्चार मोदींनी आज केला. तसेच आघाडीतील आणखी एका पक्षाने खूप भयानक घोषणा केली आहे. पोखरणच्या मातीने भारताला अण्वस्त्रांनी संपन्न केले. आता या आघाडीचे म्हणणे आहे की, ते भारतातील अण्वस्त्रे नष्ट करणार आहेत. ही कसली आघाडी आहे, जी भारताला शक्तीहीन करू इच्छिते, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.