New Delhi News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला अडचणीत आणले आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी अमेरिकेतील वारसा कराबाबत केलेल्या विधानाचे भांडवल करत भाजपने काँग्रेसला घेरले होते. आता पुन्हा एकदा पित्रोदा यांनी भारतियांच्या दिसण्यावरून विधान केले असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत पित्रोदा यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले आहे.
पित्रोदा यांनी एका मुलाखतीमध्ये भारतियांच्या दिसण्यावरून केलेले विधान वादात सापडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर भारतातील (India) लोक गोरे दिसतात. तर पुर्व भारतातील लोक चायनीज वाटतात. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन तर पश्चिम भारतातील लोक अरब दिसतात. अशा विविधता असलेल्या देशामध्ये तरीही सर्वजण एकत्र राहतात.
पित्रोदा यांचे हे विधान समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) प्रचारसभांमधून काँग्रेस व राहुल गांधीवर (Rahul Gandhi) हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, अमेरिकेमध्य शहजादेचे (राहुल गांधी) एक अंकल राहतात. ते शहजादेचे मार्गदर्शक आहेत. ज्यांच्या त्वचेचा रंग काळा असतो, ते सर्व अफ्रिकन आहेत. याचा अर्ज त्यांनी तुम्हा सर्वांना, माझ्या देशातील लोकांना त्वचेच्या रंगावरून शिवी दिली आहे. तेव्हा मला समजले की राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनाही त्यांनी आफ्रिकन मानले म्हणून त्यांना हरवू इच्छित होते. कारण त्यांच्या त्वचेचा रंगही काळा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पित्रोदा यांच्या या विधानानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसने (Congress) या वादातून अंग काढून घेतले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पित्रोदा यांनी भारतातील विविधतेला दिलेला उपमा अस्वीकार्य आहे. या वक्तव्यापासून काँग्रेस अलिप्त असल्याचे जयराम रमेश म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे अद्याप बाकी आहेत. त्यातच पित्रोदा यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वीही त्यांनी वारसा हक्काबाबत वक्तव्य केले होते. त्याचाही भाजपने खरपूस समाचार घेतला होता. त्यामुळे आता काँग्रेस सॅम पित्रोदा यांच्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.