New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून विरोधकांवर मुस्लिम आरक्षण तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यावरून विरोधकांकडून मोदींवर पलटवार करताना मोदी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, मुस्लिमद्वेष त्यांच्या भाषणात दिसत असल्याचा पलटवार केला जात आहे. त्यावर मोदींनी एका मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले विरोधक मला मुस्लिमांवरून (Muslim) घेरतात. पण मी रमझानचा महिना सुरू असताना इस्त्रालयमध्ये विशेष दूत पाठवून गाझावरील हल्ला थांबवण्यासाठी प्रयत्न केला होता. इस्त्रायलचे राष्ट्रपती, पंतप्रधान सगळ्यांना बेटा आणि त्यांना रमझान महिन्यात तरी गाझावर बॉम्बहल्ला करू नये, असे विशेष दूतांना सांगितले होते. त्यांनीही याचे पालन करण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी याची कधी पब्लिसिटी करत नाही. (Latest Lok Sabha Election Update)
काँग्रेसचे (Congress) मागील सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचे ढोंग करत होती, अशी टीका करत मोदी म्हणाले, इस्त्रायल, फिलिस्तीनला जाऊन धर्मनिरपेक्षतेची फॅशन करून परत येण्याची फॅशन सुरूवातीला आपल्याकडे होती. मला हे ढोंग करण्याची गरज नाही. मी इस्त्रायल, फिलिस्तीनलाही गेलो. मी लपून-छपून, अमेरिकेला सांगून काही करत नाही. त्यांना विचारण्याची गरज भासत नाही. रशियाकडून माझ्या देशाला स्वस्त पेट्रोल मिळत असेल तर मी घेणार. मी काहीही न लपवता देश चालवतो, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारत (India) आता कोणत्याही तिसऱ्या देशाला विचार करून कोणताही निर्णय घेत नाही. भारतातील लोकांच्याच हिताचे निर्णय घेतो. इतरांना वाईट वाटले तर...असा विचार न करता मी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतो, असेही मोदींनी सांगितले.
रशियाचे राष्ट्रपती माझी खूप प्रशंसा करत असतील तर याचा अर्थ मी पुतीन यांना भेटून आता ही युध्दाची वेळ नाही, असे म्हणून शकत नाही. काय चुकीचे, काय बरोबर, हे एखादा मित्र सांगत असेल तर ते त्याचाही सन्मान करतील. युक्रेनचाही माझ्यावर तेवढाच विश्वास आहे, असेही मोदींनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.