Lok Sabha Election 2024 : बहुमत मिळाले नाही तर ‘प्लॅन बी’ काय असेल? अमित शाहांनी केला मोठा दावा

Amit Shah News : विरोधकांनी भाजप 200 चा आकडाही पार करू शकणार नाही, असा दावा केला आहे. मात्र, भाजपचे नेते एनडीए 400 पार जाणार, असा विश्वास व्यक्त करत आहेत.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. त्यानुसार देशभरात प्रचाराचा धडाकाही सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांती नेत्यांकडून भाजपला यावेळी 200 जागाही मिळणार नाही, असा दावा केला जात आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार भाजप बहुमताचा आकडा गाठू शकले नाही तर पक्षाचा ‘प्लॅन बी’ कोणता असेल, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह (Amit Shah) यांनी पुन्हा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सरकारने मागील दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती शाहांनी दिली. याच कामांच्या आधारे भाजप 400 हून अधिक जागा मिळवत सत्तेत येईल, असे शाह म्हणाले. (Latest Political News)

Amit Shah
Swati Maliwal Case : …त्यावेळी केजरीवालांच्या घरी काय झाले? मारपीट कशी झाली? मालीवाल यांनीच दिली माहिती

भाजपला (BJP) बहुमत गाठता आले नाही तर प्लॅन बी काय असेल, असा प्रश्न शाहांना विचारण्यात आला होता. त्यावर शाह म्हणाले, प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असते, त्याचवेळी प्लॅन बी बनवला जातो. मला विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी मोठ्या बहुमताने सत्तेत येतील. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देश सुरक्षित असावा, समृध्द व्हावा, जगात देशाता सन्मान वाढवा, देश आत्मनिर्भर बनावा, विकसित भारत बनवा, हे देशातील सर्व नागरिकांना हवे आहे. मागील दहा वर्षांत जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचे प्रत्येक भारतीयाला वाटते, असेही शाह पुढे म्हणाले.

मोदींकडे 60 कोटी लाभार्थ्यांची फौज

मोदींसोबत देशातील 60 कोटी लाभार्थ्यांची फौज उभी असल्याचा दावा शाहांनी केला. या लाभार्थ्यांचा ना कुठली जात आहे ना धर्म. आम्ही चार कोटी गरिबांना घर दिलं. नवे सरकार तीन कोटी गरिबांना घर देईल. आम्ही 32 कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड दिले. हर घर नल योजनेअंतर्गत 1 कोटी घरांमध्ये पाणी पोहचवले. दहा कोटी घरांमध्ये एलपीजी सिलेंडर दिले. 12 कोटी घरांमध्ये शौचालय बनवले. एक कोटी 41 लाख गरीब महिलांना लखपती दीदी बनवले. या लोकांची फौज मोदींसोबत असल्याचे शाह म्हणाले.

Amit Shah
Lok Sabha Election 2024 : मायावतींबाबत मौन अन् अखिलेशवर आगपाखड; उत्तर प्रदेश जिंकण्याची भाजपची रणनीती काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com